आयएफएस सांगणारी ज्याेती निघाली बनावट ; एक खोटे लपविण्यासाठी सतत खोटे बाेलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 07:57 IST2024-07-19T07:56:33+5:302024-07-19T07:57:05+5:30
ज्योतीची यूपीएससीत निवडच झाली नसल्याचे समोर आले असून, तिला कधीही माद्रिदमध्ये पोस्टिंग मिळाले नाही. पण २०२२ मध्ये यूपीएससीत निवड झाल्याची खोटी माहिती तिने कुटुंबीयांना दिली होती.

आयएफएस सांगणारी ज्याेती निघाली बनावट ; एक खोटे लपविण्यासाठी सतत खोटे बाेलली
नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेत वेगवेगळ्या कोट्यातून निवडलेल्या उमेदवारांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यात आता २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षेत निवड झाल्याचा दावा करणाऱ्या ज्योती मिश्राचे प्रकरण समोर आले. आरक्षण कोट्यातून निवड झाल्याची चर्चा झाल्यानंतर ज्योती मिश्राने त्यावर स्पष्टीकरण देत सध्या मी आयएफएस असून, माझे सध्या माद्रिद दूतावासात पोस्टिंग आहे, असे सांगितले होते. मात्र त्यानंतर जे समोर आले ते धक्का देणारे आहे.
ज्योतीची यूपीएससीत निवडच झाली नसल्याचे समोर आले असून, तिला कधीही माद्रिदमध्ये पोस्टिंग मिळाले नाही. पण २०२२ मध्ये यूपीएससीत निवड झाल्याची खोटी माहिती तिने कुटुंबीयांना दिली होती.
नेमके काय केले?
ज्योतीने २०२० आणि २०२१ मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली, पण तिची निवड झाली नाही. २०२२ मध्ये निकाल लागला तेव्हा तिची बहीण आरतीने ज्योती हे नाव पाहिले. त्यानंतर आरतीने तिला हे नाव तुझे आहे का असे विचारले.
या वेळीदेखील ज्योतीने ते नाव तिचे असल्याचे सांगितले. हे एक खोटे लपवण्यासाठी तिने पासपोर्टपासून, अपॉइंटमेंट लेटर, आयडीसारखी बनावट कागदपत्रे तयार केली. ती दिल्लीत एक निमशासकीय फर्ममध्ये नोकरी करत असल्याचे समोर आले आहे.