अक्षय उर्जा हवी असेल तर ती ज्ञानातच आहे (भाग २)

By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:22+5:302015-02-08T00:19:22+5:30

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विजय भटकर यांच्या शेजारी बसण्याचा योग माझ्यासाठी मोठा आहे. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा हा क्षण मी विसरू शकणार नाही. कमी खर्चात परमसंगणक तयार करणाऱ्या भटकरांकडून सकारात्मक ऊर्जा मिळते. गिरीश गांधी यांच्या कल्पक नेतृत्वातून हा पुरस्कार देण्यात येतो, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले पाहिजे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी २०२० चे या देशाचे व्हिजन दिले त्यावर नरेंद्र मोदी काम करीत आहे आणि आम्हीही १६ तास काम करतो आहोत. भटकर यांच्या हातूनही ही देशसेवा घडत राहावी, यासाठी जगदंबेला प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.

If you want Akshaya energy, then it is wise (part 2) | अक्षय उर्जा हवी असेल तर ती ज्ञानातच आहे (भाग २)

अक्षय उर्जा हवी असेल तर ती ज्ञानातच आहे (भाग २)

द्रशेखर बावनकुळे म्हणाले, विजय भटकर यांच्या शेजारी बसण्याचा योग माझ्यासाठी मोठा आहे. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा हा क्षण मी विसरू शकणार नाही. कमी खर्चात परमसंगणक तयार करणाऱ्या भटकरांकडून सकारात्मक ऊर्जा मिळते. गिरीश गांधी यांच्या कल्पक नेतृत्वातून हा पुरस्कार देण्यात येतो, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले पाहिजे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी २०२० चे या देशाचे व्हिजन दिले त्यावर नरेंद्र मोदी काम करीत आहे आणि आम्हीही १६ तास काम करतो आहोत. भटकर यांच्या हातूनही ही देशसेवा घडत राहावी, यासाठी जगदंबेला प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भटकर पुरस्कारांपेक्षा मोठे आहेत. विज्ञानाचा लाभ समाजातील विषमता दूर करण्यासाठी होते. पूर्वी जमीन असणारा श्रीमंत होता, नंतर उद्योग उभारणारा आणि सध्या ज्ञानी माणूस श्रीमंत होतो आहे. ही ज्ञानसाधना सर्वांनीच करीत राहणे हीच देशसेवा आहे. खा. अजय संचेती म्हणाले, भटकरांमुळे या पुरस्काराचीच उंची वाढली. त्यांचा सत्कार नीरीच्या सभागृहात होतो आहे, हे औचित्यपूर्ण आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातून सामान्यांचे जीवन समृद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. त्यामुळेच त्यांचा सन्मान करताना आनंद वाटतो. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ट परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा शुभेच्छापर संदेश ऐकविण्यात आला. डॉ. सतीश वटे यांनी भटकर यांचा संक्षिप्त परिचय करून दिला. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर तर आभार ए. के. गांधी यांनी मानले.
--------
नागपुरात आयुष्यातील सोनेरी क्षण
नागपूर माझे आवडते शहर आहे. या शहरात आयुष्यातील महत्त्वाचे क्षण घालविले येथेच खूप काही शिकलो. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, याची खंत वाटते. ऋषी आणि कृषी समृद्ध असल्याशिवाय देश संपन्न होणार नाही. त्यामुळेच आपण नैसर्गिक शेती करायला हवी, असे वाटते. शाश्वत शेती हवी असेल तर गाय महत्त्वाची आहे. गाय आपल्या संस्कृतीचा, अर्थविश्वाचाही महत्त्वाचा घटक आहे. याबाबत आयआयटीचे विद्यार्थीही संशोधन करीत आहेत, असे विजय भटकर म्हणाले. (प्रतिनिधी)
(फोटो ओळींसह रॅपमध्ये आहे.)

Web Title: If you want Akshaya energy, then it is wise (part 2)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.