जनतेची सोबत असल्यास मोठ्या अडचणीला सामोरे जाऊ - मोदी
By Admin | Updated: January 29, 2016 21:28 IST2016-01-29T21:04:13+5:302016-01-29T21:28:03+5:30
आम्हाला जनतेने साथ दिली तर आम्ही कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ, येणाऱ्या कोणत्याही अडचणीतून नवीन मार्ग शोधू असे मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले

जनतेची सोबत असल्यास मोठ्या अडचणीला सामोरे जाऊ - मोदी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - आम्हाला जनतेने साथ दिली तर आम्ही कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ, यणाऱ्या कोणत्याही अडचणीतून नवीन मार्ग शोधू असे मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले ते इकनॉमस् टायम्स बिजनस ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. मार्च २०१६ पर्यंत चंदिगड 'केरोसीन फ्री' शहर होणार असल्याचं त्यांनी सुचित केले. वातावरणात होत असलेले बदल रोखणे हे सध्याच्या पिढीसमोरचे मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी सांगीतलं.
अर्थव्यवस्थेत होणारी सुधारणा हे दर्शवते की आपल्या देशात सबका साथ सबका विकास सुरू आहे. ६५ लाख लोकांनी स्वत:हून घरगुती गॅसवरील सबसिडी हटवली आहे. गरीबांच्या जीवनात चांगले बदल पाहायला मिळत आहेत. जगभरातील देशांच्या एफडीआयमध्ये घट होत असताना भारतात मागील १८ महिन्यांत एफडीआयमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
२०१३-१४मध्ये शिपिंग कॉर्पोरेशनला २७५ कोटींचा तोटा झाला होता, २०१४-१५ मध्ये २०१ कोटींचा फायदा झाला आहे.
२ वर्षापासून भारतातील परदेशी गुंतवणूक वाढली आहे, तसेच भारताची सध्याची निर्यात ही पहिल्यापेक्षा आता चांगली आहे. यावर्षी भारताचा FDI ३९ टक्केने वधारला आहे. अर्थव्यवस्थेत होणारी सुधारणा हे दर्शवते की आपल्या देशात सबका साथ सबका विकास सुरू आहे.