तर जशास तसे उत्तर देऊ : कृष्ण्
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30
ााजी यादव

तर जशास तसे उत्तर देऊ : कृष्ण्
ा जी यादवइंदापूर । दि. ३० (वार्ताहर) आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर वैयक्तिक टिका करणे, धमकीची भाषा वापरणे थांबवावे; अन्यथा काँग्रेसचे कार्यकर्ते त्यास, जशास तसे उत्तर देतील, असा इशारा आज पत्रकार परिषदेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव व इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी दिला.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मयुरसिंह पाटील, नगराध्यक्ष अशोक इजगुडे,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गोरख शिंदे, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे, पंचायत समितीचे उपसभापती नारायण वीर, प्रा. कृष्णा ताटे, ॲड. गिरीश शहा आदी यावेळी उपस्थित होते. ॲड. यादव म्हणाले की, आमदारकीच्या एका वर्षाच्या काळात तालुक्यात विकास कामे करण्यात आमदार भरणे यांना अपयश आले. त्यामुळे विरोधकांसाठी धमकीची भाषा वापरत आहेत. धमकीच्या भाषेला काँग्रेसचे कार्यकर्ते भीक घालत नाहीत. त्यास तोंड देण्यास ते समर्थ आहेत, असा इशारा त्यांनी दिला. नगराध्यक्ष अशोक इजगुडे म्हणाले की, शहराच्या विकासासाठी गेल्या पाच -सात वर्षांत हर्षवर्धन पाटील यांनी सुमारे ८० ते ८५ कोटी रुपयांची कामे केली. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ४० ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी नाकारले आहे. चुकीची आकडेवारी देवून त्यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, असे मयुरसिंह पाटील म्हणाले. -------------------------------