शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गरीबांना वेतनानंतर राहुल गांधी यांनी महिलांना दिले मोठे आश्वासन, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 19:26 IST

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. सत्तेत आल्यास गरिबांना दरमहा निश्चित वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राहुल गांधी यांनी महिलांनाही मोठे आश्वासन दिले आहे.

ठळक मुद्दे2019 साली सत्तेत आल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये पारित करून घेऊमहिलांच्या नेतृत्वाला राजकीय क्षेत्रात वरच्या पातळीवर आणण्याची आमची इच्छा लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी महिला आरक्षण विधेयकात तरतूद

कोचिन -  2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. सत्तेत आल्यास गरिबांना दरमहा निश्चित वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राहुल गांधी यांनी महिलांनाही मोठे आश्वासन दिले आहे. 2019 साली सत्तेत आल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महिलाआरक्षण विधेयक संसदेमध्ये पारित करून घेऊ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.कोचिन येथे बुथ कार्यकर्त्यांशी चर्चा करताना राहुल गांधी यांनी सांगितले की, ''2019 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सर्वप्रथम आम्ही संसदेत महिला आरक्षण विधेयक पारित करून घेऊ. महिलांच्या नेतृत्वाला राजकीय क्षेत्रात वरच्या पातळीवर आणण्याची आमची इच्छा आहे.'' एका कार्यकर्त्याने दिलेल्या सल्ल्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ही घोषणा केली.

 महिला आरक्षण विधेयक गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी या विधेयकात तरतूद आहे. मात्र राजकीय एकमत होऊ न शकल्याने हे विधेयक अद्याप पारित झालेले नाही. दरम्यान,  राहुल गांधी यांनी कोचिन येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जवळच्या 15 मित्रांना कमाल उत्पन्न गॅरंटी दिली असून शेतकऱ्यांना मात्र फसविले आहे. तुम्ही अनिल अंबानी असाल तर या योजनेचा लाभ मिळेल. या उलट काँग्रेस किमान उत्पन्न योजना आणली असून ही योजना सर्व भारतीयांसाठी लागू होईल. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षांत एकच काम केले, ते म्हणजे एका मागोमाग एक खोटे बोलणे. यामुळे देशाचा वेळ वाय़ा गेला. तरणांना 2 कोटी रोजगार उपलब्ध करण्याचेही आश्वासन त्यांनी दिलेले. किती जणांना रोजगार मिळाले ही आकडेवारीच समोर आली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKeralaकेरळWomenमहिलाreservationआरक्षण