शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आमची सत्ता आल्यास पोलिसांची वर्दी उतरवू, भाजप नेत्याची थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 15:23 IST

पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पोलीस अधिकाऱ्यांनाच धमकावले आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धमकावले आहे. जर राज्यात भाजपाचे सरकार आले, तर तुमच्या सगळ्यांची वर्दी उतरवू, अशी धमकीच घोष यांनी पोलिसांना दिली. कोलकाता पोलीस आता या वर्दीच्या लायकीचे नाहीत, असेही त्यांनी म्हटले. कोलकातापासून 180 किमी दूर असलेल्या बीरभूम जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना घोष यांनी पोलिसांना जाहीरपणे धमकीवजा इशारा दिला. 

आम्ही सर्वच बाबीचे रेकॉर्ड ठेवत आहोत, त्यामुळे सत्तेत आल्यानंतर आम्ही त्या अधिकाऱ्यांना बघून घेऊ, ज्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. त्या सर्वांना भरपाई करावीच लागेल, असेही घोष यांनी म्हटले. तसेच तृणमूल काँग्रेसचे कार्यालय म्हणजे बॉम्ब बनविण्याचे ठिकाण आहे. मात्र, पोलीस राज्यातील गुन्हे लपविण्याचे काम करत असल्याचेही घोष यांनी म्हटले. 

दरम्यान, घोष यांच्या गाडीवर महिन्याच्या सुरुवातीलाच हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी घटनास्थळावर असलेल्या पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला होता. तर, देशात केवळ प.बंगाल हे एकमेव राज्य आहे, जेथे लोकशाहीला अजिबात स्थान नाही, असेही सिंह यांनी म्हटले होते.  

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिसMamata Banerjeeममता बॅनर्जी