भाजपा सत्तेत आल्यास हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर ठेवणार- टी. राजा सिंह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 23:07 IST2018-11-08T23:07:15+5:302018-11-08T23:07:22+5:30
वादग्रस्त विधानासाठी नेहमीच चर्चेत असणारे तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी हैदराबादचं नाव बदलणार असल्याचं सांगितलं आहे.

भाजपा सत्तेत आल्यास हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर ठेवणार- टी. राजा सिंह
हैदराबाद- वादग्रस्त विधानासाठी नेहमीच चर्चेत असणारे तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी हैदराबादचं नाव बदलणार असल्याचं सांगितलं आहे. जर भाजपा पुन्हा सत्तेत आली, तर हैदराबादचं नाव बदलू, असंही टी. राजा सिंह म्हणाले आहेत. ते म्हणाले, भाजपाला तेलंगणामध्ये सत्ता मिळाली, तर हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर ठेवू, असे टी. राजा सिंह म्हणाले आहेत.
हैदराबादेतल्या गोशमहल विधानसभेच्या जागेवरून टी. राजा सिंह हे भाजपाचे आमदार आहेत. तसेच भाजपा सत्तेत आल्यास भाजपा सिकंदराबाद आणि करिमनगरचंही नाव बदलेल, असंही टी. राजा सिंह पुढे म्हणाले आहेत. राजा सिंह म्हणाले, 1590मध्ये कुतुब शाह हैदराबादेत येण्यापूर्वी त्या शहराचं नाव भाग्यनगर होते. परंतु त्यानंतर भाग्यनगरचं नाव बदलून हैदराबाद ठेवण्यात आले. त्यावेळी हिंदूंवर हल्ला करण्यात आला होता. अनेक मंदिर नष्ट करण्यात आली. आम्ही हैदराबादच्या नामकरणाची योजना तयार करत आहोत.
तेलंगणात भाजपा बहुमतानं विजयी होणार आहे. तेव्हा आम्ही पहिल्यांदा राज्याच्या विकासाला प्राधान्य देऊ आणि त्यानंतर हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करू, तसेच सिंकदराबाद आणि करिमनगरचेही नाव बदलू, असंही ते म्हणाले आहेत. मुगल आणि निजामांच्या नावांनी ठेवण्यात आलेल्या शहरांची नावं बदलून देशासाठी लढणा-या स्वातंत्र्यसैनिक किंवा शहिदांची नावं देऊ, टी. राजा सिंह यांनी असंही सांगितलं आहे. विशेष म्हणजे गुजरातमधल्या अहमदाबादचं नाव बदलून कर्णावती ठेवण्यात येणार असल्याच्या घोषणेनंतर टी. राजा सिंह यांचं हे विधान आलं आहे.