शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

हिंदू एकवटले नाही तर शहरं पाकिस्तानसारखी होतील, भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 12:54 PM

भाजपामधील काही नेतेमंडळी अनेकदा बेताल विधान करुन नवनवीन वाद निर्माण करताना दिसतात. भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांच्या यादीतील उदयपूरमधील भाजपाचे आमदार गुलाब चंद कटारिया यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

ठळक मुद्देBJP MLA गुलाब चंद कटारिया यांचे वादग्रस्त विधान हिंदू एकवटले नाहीतर शहरांचं पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल - कटारिया

जयपूर - भाजपामधील काही नेतेमंडळी अनेकदा बेताल विधान करुन नवनवीन वादांना आयते निमंत्रण देतात. भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांच्या यादीतील उदयपूरमधील भाजपाचे आमदार गुलाब चंद कटारिया यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. 'जर हिंदू एकत्र आले नाहीत तर राजस्थानमधील कित्येक शहरांचे पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल', असे वादग्रस्त विधान गुलाब चंद कटारिया यांनी केले आहे. कटारिया यांच्या विधानामुळे नवीन वादाला फोडणी मिळू शकते. 

उदयपूर येथील वल्लभ नगर ब्लॉकमधील एका गावामध्ये नवीन वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना गुलाब चंद कटारिया यांनी हे विवादित विधान केले आहे. याप्रकरणी कटारिया यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले जात आहे. कटारिया यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

गुलाब चंद कटारिया यांचं वादग्रस्त विधान  'जर हिंदू एकवटले नाहीत तर राजस्थानमधील कित्येक शहरांचे पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल. संधी मिळाल्यास जुन्या जयपूरला भेट द्या. या परिसरातील मंदिरांमध्ये असणाऱ्या मूर्तींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आहेत, कारण येथील मंदिरातील मूर्तींची सेवा होत नाही. कोणत्याही धार्मिक रीतिरिवाजांचे येथे पालन होऊ शकत नाही, कारण येथील लोक मंदिर परिसरात मांस-हाडे फेकतात. या लोकांसोबत प्रत्येक दिवशी कोण वाद घालत बसेल?'

'पंक्चरवाल्यांसोबत पळून जात आहेत मुली'

गुलाब चंद कटारिया येथेच थांबले नाहीत. ते पुढे असंही म्हणाले की, ''आता लोकांना कुटुंब आणि तरुण मुलींचा बचाव करण्यासाठी घर सोडून जाव लागत आहे. तुम्हाला माहितीय लव्ह जिहाद काय आहे?. तुमच्या मुली पंक्चरवाल्यांसोबत पळून जात आहेत. त्यामुळे जर तुम्ही चुका करत असाल तर यातून वाचण्याचा कोणताही मार्ग नाही. यावर तुम्ही केवळ रडू शकता. धोका लक्षात घेऊन हिदूंनी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी एकत्र यायला हवं. आपण सर्व रामाचे पुत्र आहोत, जाती आणि धर्म विसरुन जा. रामच आपला धर्म आणि जात आहे. आपण जेव्हा मरतो, तेव्हाही 'राम-राम' म्हणतो. एकमेकांना भेटतो तेव्हाही 'राम-राम' याच शब्दाचा उपयोग करतो'', अशी वादग्रस्त विधानांची मालिकाच कटारिया यांनी सभेत सुरू ठेवली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांना चांगलंच फटकारलं होतं. भाजपाच्या काही नेत्यांनी कमी बोलण्याची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले होते. भाजपाच्या नेत्यांनी मीडियाला सामोरं जाताना कमी बोललं पाहिजे.  आमच्याजवळ भरपूर नेते आहेत आणि त्यातील काहींना पत्रकारांशी बोलण्यास फार आवडते. त्यामुळेच आम्हाला त्या उत्साही नेत्यांना दुसरं काम देण्याची आवश्यकता आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं आहे.

टॅग्स :BJPभाजपाMuslimमुस्लीमPakistanपाकिस्तानLove Jihadलव्ह जिहाद