शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"जर दलित नसतो तर आज SC मध्ये न्यायाधीश नसतो"; असं का म्हणाले न्यायमूर्ती गवई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 15:48 IST

न्यायमूर्ती गवई यांची 14 नोव्हेंबर 2003 रोजी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते 11 नोव्हेंबर 2005 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे अॅडिशनल जज होते. यानंतर 12 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांना कायमस्वरूपी न्यायाधीश करण्यात आले होते. ते या पदावर 24 मे 2019 पर्यंत होते.

जर आपण दलित समाजातील नसतो, तर आज सर्वोच्च नयायालयात न्यायाधीश नसतो, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "आरक्षणामुळे अर्थात सकारात्मक कृतीमुळेच उपेक्षित समाजातील लोकही आज भारतामध्ये उच्च सरकारी पदांवर पोहोचण्यात यशस्वी होऊ शकले आहेत. जर सर्वोच्च न्यायालयामध्ये सामाजिक प्रतिनिधित्वांतर्गत अनुसूचित जातीच्या व्यक्तीला लाभ दिला गेला नसता, तर कदाचित आपण दोन वर्षांनंतर पदोन्नतीने या पदावर आलो असतो."

जस्टिस गवई हे पूर्वी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत होते. स्वतःला उदाहरण म्हणून सादर करताना गवई म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयात त्यांची पुदोन्नती दोन वर्षांपूर्वीच करण्यात आली आहे. कारण दलित समाजाच्या न्यायाधिशांना बेंचमध्ये ठेवण्याची कॉलेजियमची इच्छा होती.  मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यामागेही हे एक कारण होते." ते म्हणाले, "2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा आपण वकील होतो आणि त्यावेळी उच्च न्यायालयात एकही दलित न्यायाधीश नव्हता."

गवई म्हणाले, "माझी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होताना दलित असणे हा महत्त्वाचा घटक होता." न्यायमूर्ती गवई यांची 14 नोव्हेंबर 2003 रोजी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते 11 नोव्हेंबर 2005 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे अॅडिशनल जज होते. यानंतर 12 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांना कायमस्वरूपी न्यायाधीश करण्यात आले होते. ते या पदावर 24 मे 2019 पर्यंत होते. यानंतर त्यांना पदोन्नती देत सर्वोच्च न्यायालयात आणण्यात आले. ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. ते सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचा भाग आहेत. बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, जस्टिस भूषण रामकृष्ण गवई न्यूयॉर्क सिटी बार असोसिएशनने (NYCB) आयोजित केलेल्या एक कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते आपल्या जीवनावरील, विविधता, समानता आणि समावेशाच्या प्रभावाशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देत होते. NYCB ही लॉचे विद्यार्थी आणि वकिलांची एक स्वयंसेवी संस्था आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षणCourtन्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट