शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विजय मिळाला नाही, तर भाजप होणार प्रबळ विरोधी पक्ष; टी. राजा सिंह यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 08:43 IST

त्रिकाेणी लढतीकडे राज्याचे लक्ष

हैदराबाद : तेलंगणाच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळाला नाही तर तो प्रबळ विरोधी पक्ष म्हणून पुढे येईल, असे गोशामहल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार टी. राजा सिंह यांनी गुरुवारी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकांतही ते गोशामहल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. टी. राजा सिंह यांनी सांगितले की, भारत राष्ट्र समितीने  (बीआरएस) असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम या पक्षातील नेत्यांशी हातमिळवणी केली आहे. 

गोशामहल मतदारसंघात १७ हजार बोगस मतदारांची नावे नोंदविण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. टी. राजा सिंह यांची लढत बीआरएसचे नंदकिशोर व्यास व काँग्रेसच्या मोगिली सुनीता या उमेदवारांशी होणार आहे. राजा सिंह यांच्यावरील कारवाई पक्षाने मागे घेतली. त्यामुळे येथे रंगत निर्माण झाली आहे. (वृत्तसंस्था)

‘तिसऱ्यांदाही मीच निवडून येणार’

भाजपचे उमेदवार टी. राजा सिंह यांनी सांगितले की, मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येणार आहे. गोशामहल मतदारसंघात मी गेल्या नऊ वर्षांत ५०० कोटी रुपयांची विकासकामे करून घेतली आहेत. काँग्रेसच्या उमेदवार मोगिली सुनीता म्हणाल्या की, गोशामहल मतदारसंघात टी. राजा सिंह हे एकेकाळी अतिशय प्रबळ उमेदवार होते. पण आता तसे नाही. सिंह हे मतदारसंघात क्वचितच दिसतात.

विशिष्ट धर्माबद्दल अतिशय अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार टी. राजा सिंह यांना भाजपने निलंबित केले होते. ही कारवाई गेल्या महिन्यात मागे घेण्यात आली. पक्षाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर या घडामोडी घडल्या होत्या. अवमानकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना नोव्हेंबर २०२२मध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला. 

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाcongressकाँग्रेस