शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर मोदींनी सर्वांसमक्ष चर्चा करावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 07:50 IST

ममतांचे आव्हान; भाजपला बहुमत अशक्यच

विशाखापट्टणम : हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या कामगिरीबाबत विरोधकांशी खुलेआम चर्चा करावी, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकांत भाजपला १२५ पेक्षा जास्त जागा व बहुमत मिळणार नाही, असेही भाकीत त्यांनी वर्तविले.

तेलुगू देसम पार्टीने येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, २०१४च्या निवडणुकीत दक्षिण भारतात भाजपने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यातील १७ जागा कर्नाटकातील होत्या. आगामी लोकसभा निवडणुकांत एवढ्याही जागा भाजपला जिंकता येणे अशक्य आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपचा धुव्वा उडाला आहे. गुजरातमध्येही या पक्षाला लोकसभेच्या पूर्वीसारखा विजय मिळणार नाही. उत्तर प्रदेशात २०१४ साली भाजपविरोधी मतांत विभागणी झाल्याने त्या पक्षाला ८० पैकी ७३ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपला त्या राज्यात १५ हून जास्त जागा मिळणे अवघड आहे. एनडीए सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामगिरीवर मोदींची खुलेआम चर्चा करण्याची तयारी असल्यास विरोधकांकडून आम्ही एक प्रतिनिधी पाठवू. तो कोणत्याही कागदपत्रांचा आधार न घेतामोदींना प्रश्न विचारेल. मोदींनीही कोणती कागदपत्रे न चाळताकिंवा टेलिप्रॉम्पटरची मदत न घेता उत्तरे द्यावीत, अशी उपरोधिक टीकाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. (वृत्तसंस्था)‘सैन्याचा अवमान’भारतीय सैन्याला मोदींची सेना म्हणणाऱ्या योगी आदित्यनाथांनी संरक्षण दलांचा अवमान केला आहे अशी खरमरीत टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, भारतीय सैन्य भाजपच्या मालकीचे नसून ते साऱ्या देशाचे आहे. देशाच्या संरक्षण दलांबद्दल आम्हाला रास्त अभिमान आहे. प्रत्येक नागरिकाने योगी आदित्यनाथ यांच्या विधानांचा निषेध केला पाहिजे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा