शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 11:08 IST

आयोगाने बिल्डरला ९ टक्के व्याजासह रक्कम परत देण्याचे आदेश दिले. याला बिल्डरने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : बिल्डरने ठरलेल्या मुदतीत फ्लॅट ताब्यात न दिल्यास ग्राहकाला परतावा आणि व्याजासह नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. देशभरातील लाखो फ्लॅट खरेदीदारांना दिलासा देणारा हा निर्णय बिल्डर-खरेदीदार वादात ‘मार्गदर्शक’ ठरणार आहे.

राजनीश शर्मा यांनी बिझनेस पार्क टाऊन प्लॅनर्स लिमिटेड कंपनीकडून २००६ मध्ये फ्लॅट खरेदी केला होता. २८ लाख रुपये दिले, पण २०१८ पर्यंत फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. शर्मा यांनी राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगाने बिल्डरला ९ टक्के व्याजासह रक्कम परत देण्याचे आदेश दिले. याला बिल्डरने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. त्यांनी युक्तिवाद केला की, विलंब झाल्यास ठराविक रक्कमच भरपाई देण्याचे कलम करारात आहे . त्यामुळे पूर्ण रक्कम परताव्याचा आयोगाचा आदेश चुकीचा आहे. 

ग्राहक दुर्बल , त्याला संरक्षण मिळाले पाहिजे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकास न्याय मिळणे हे मूलभूत तत्त्व आहे. करारातील बिल्डरच्या एकतर्फी अटी ग्राहकांवर लादता येणार नाहीत. करारातील एकतर्फी दंड किंवा नुकसान भरपाईची मर्यादा बंधनकारक मानली जाऊ शकत नाही. ग्राहक दुर्बल असतो. न्यायालयाकडून त्याला संरक्षण मिळाले पाहिजे.बिल्डरने ठरलेल्या मुदतीत फ्लॅट ताब्यात न दिल्यास ग्राहकाला परतावा आणि व्याजासह भरपाई मिळावी. - न्या. सूर्यकांत आणि न्या. के. व्ही. विश्वनाथ

कंपनीने आयुष्यभराची बचतही अडकवून ठेवलीराजनीश शर्मा यांनी न्यायालयात केलेल्या युक्तिवादानुसार, कंपनीने केवळ प्रकल्पच लांबवला नाही तर माझी आयुष्यभराची बचतही अडकवून ठेवली. अशा परिस्थितीत नाममात्र भरपाई अन्यायकारक ठरेल. सर्वोच्च न्यायालयाने बिल्डरचा दावा फेटाळला. करारात पैसे देण्यास उशीर झाला तर ग्राहकाने १८ टक्के व्याज द्यावे व फ्लॅट देण्यास उशीर झाला तर बिल्डरने ९ टक्के व्याज द्यावे अशीही अट होती. यावर सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला. जी अट ग्राहकांना लागू असते, तीच अट बिल्डरलाही लागू असली पाहिजे, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने १८ टक्के व्याजासह रक्कम ग्राहकाला परत करण्याचे आदेश दिले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Flat Delay: Builder Must Pay 18% Interest, Rules Supreme Court

Web Summary : The Supreme Court ruled builders must compensate flat buyers with 18% interest for project delays. This landmark decision protects consumer rights, ensuring fair compensation and challenging one-sided contract clauses favoring builders. It reinforces that buyers deserve protection.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय