शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

"जर रामदेवाला ओळख सांगण्यात अडचण नसेल तर रहमानला का...?", नेमप्लेट वादावर बाबा रामदेव यांची CM योगींना साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 11:23 IST

यूपीचे मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी आरोप केला आहे की, "काही मुस्लीम दुकानदार, हिंदू नावांच्या आडून यात्रेकरूंना नॉन व्हेज खाद्य पदार्थांची विक्री करतात. ते वैष्णो ढाबा भंडार, शाकुंभरी देवी भोजनालय आणि शुद्ध भोजनालयासारखी नावे लिहितात आणि मांसाहारी भोजन विकतात."

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने शुक्रवारी कांवड यात्रेकरूंच्या श्रद्धेचे पावित्र्य राखण्यासाठी राज्यभरातील कांवड यात्रा मार्गांवरील सर्व फळांची दुकाने, भोजनालये, उपाहारगृहे यांना मालकांच्या नावाची ‘नेम प्लेट’ लावण्याचे आदेश दिले आहेत. योगी सरकारच्या या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. हे बाजपचे सांप्रदायिक आणि फुटिरतावादी राजकारण असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. तर, इतर धर्मियांप्रमाणे, हिंदूंनाही त्यांच्या श्रद्धेचे पावित्र राखण्याचा अधिकार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. यासंदर्भात आता योग गुरू बाबा रामदेव यांनीही भाष्य केले आहे. 

बाबा रामदेव म्हणाले, "रामदेवाला त्याची ओळख सांगण्यात काही अडचण नसेल तर रहमानला त्यांची ओळख सांगण्यात का असावी? प्रत्येकाला आपल्या नावाचा अभिमान वाटतो. नाव लपवण्याची आवश्यकता नाही, कामात शुद्धता हवी बास." उत्तर प्रदेश सरकारने, हलाल सर्टिफिकेशन असलेली उत्पादने विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही आपल्या आदेशात म्हटले आहे.  महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशानंतर, उत्तराखंड सरकारनेही यात्रेकरूंच्या सुविधेसाठी कांवड यात्रा मार्गावरील सर्व फळांची दुकाने आणि भोजनालयांच्या मालकांना आपल्या नावाची नेमप्लेट लवण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच, असे न करणाऱ्या विरोधात कठोर कडक कारवाई केली जाईल, असे उत्तराखंड पोलिसांनी म्हटले आहे. 

असा निर्णय सर्वप्रथम मुझफ्फरनगरमध्ये घेण्यात आला होता. येथे जिल्हा पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा भ्रम निर्माण होऊ नये, म्हणून कांवड यात्रा मार्गावरील सर्व फळांच्या दुकानांना आणि भोजनालयांना आपल्या मालकांची नावे प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले होते.

विरोधकांचा विरोध -या निर्णयानंतर, ही राज्य सरकारद्वारे प्रायोजित 'कट्टरता' आणि 'मुस्लीम' दुकानदारांना लक्ष्य करणारी कारवाई असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव राज्य सरकारवर टीका करत म्हटले, 'असा आदेश म्हणजे सामाजिक गुन्हा आहे. शांततापूर्ण वातावरण खराब करण्याची सरकारची इच्छा आहे.'

भाजप नेत्यांकडून निर्णयाचा बचाव -या निर्णयाचा भाजपच्या अनेक नेत्यांनी बचावही केला आहे. यांपैकी यूपीचे मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी आरोप केला आहे की, "काही मुस्लीम दुकानदार, हिंदू नावांच्या आडून यात्रेकरूंना नॉन व्हेज खाद्य पदार्थांची विक्री करतात. ते वैष्णो ढाबा भंडार, शाकुंभरी देवी भोजनालय आणि शुद्ध भोजनालयासारखी नावे लिहितात आणि मांसाहारी भोजन विकतात."

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाUttar Pradeshउत्तर प्रदेशUttarakhandउत्तराखंडBJPभाजपाHinduहिंदूMuslimमुस्लीम