शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान स्वत:ला कौरव मानत असतील तर त्यांनी सांगावं, त्यांच्यांमध्ये कोण दुर्योधन आणि कोण शकुनी, आपचा बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 18:13 IST

आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. आपचे प्रवक्ते आशुतोष यांनी मोदींनी बुधवारी "शल्य" वरून केलेल्या टिप्पणीवरून टीका केली आहे.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. आपचे प्रवक्ते आशुतोष यांनी मोदींनी बुधवारी "शल्य" वरून केलेल्या टिप्पणीवरून टीका करताना, मोदी स्वत:ला कौरव पक्षातील मानत असतील तर  त्यांच्यात दुर्योधन कोण आणि शकुनी मामा कोण असा बोचरा सवाल मोदींना केला. पंतप्रधान मोदींच्या शल्यवरून केलेल्या टिप्पणीवर हल्लाकरताना आशुतोश म्हणाले,  "शल्य कौरवांच्या पक्षात होते. जर पंतप्रधान स्वत:ला कौरव पक्षातील मानत असतील तर त्यांनी सांगावं दुर्योधन कोण आणि शकुनी कोण." बुधवारी कंपनी सेक्रेटरीजना संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांनी विरोधकांचा उल्लेख शल्य म्हणून केला होता. काही लोक शल्य प्रवृत्तीचे असतात. ते कायम निराशावादी गोष्टीच करतात. असे मोदी म्हणाले होते. महाराज शल्य हे पांडवांचे मामा होते. मात्र दुर्योधनाने त्यांना कपटाने आपल्या बाजूने लढण्यास भाग पाडले होते. मात्र त्यांनी कर्णाचा सारथी बनून रथ हाकताना सातत्याने नकारात्मक टिप्पण्या करून क्रणाचे मनोधैर्य खच्ची केले होते. 

यावेळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे प्रवक्ते आशुतोष यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामधील समस्यांचा सविस्तर आकडेवारीद्वारे पाढा वाचत केंद्रातील मोदी सरकारला घेरले. आशुतोष म्हणाले, "केंद्र सरकार शिक्षण आणि आरोग्यासारथ्या पायाभूत सुविधांवरील खर्चामध्ये मोठी कपात करत आहे. त्याउलट दिल्ली सरकारकडून शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चामध्ये वाढ करत आहे. आरोग्य क्षेत्रावर केंद्र सरकार जीडीपीपैकी केवळ एक टक्का निधी खर्च करते. तर दिल्ली सरकार एकूण उत्पन्नापैकी 13 टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करते."शिक्षण क्षेत्रावरील खर्चातही केंद्र सरकाने घट केली आहे. गेल्यावर्षी देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 4 टक्के रक्कम शिक्षणावर खर्च झाली होती. मात्र यावर्षी हीच रक्कम घटवून 3.7 टक्के करण्यात आली आहे.  त्याउलट दिल्लीतील सरकारी शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण मिळत आहे. दिल्ली सरकार शिक्षणावर एकूण उत्पन्नाच्या 23 टक्के रक्कम खर्च करत आहे.   

 

टॅग्स :AAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार