शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:37 IST

4 जूनला सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल आणि सायंकाळपर्यंत नव्या सरकारचे चित्र स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहे. 1 जूनला अखेरच्या टप्प्यातील मतदान होईल. 4 जूनला सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल आणि सायंकाळपर्यंत नव्या सरकारचे चित्र स्पष्ट होईल. यातच, एनडीएने राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत एनडीए पुन्हा विजयी झाल्यास, कर्तव्यपथावर शपथविधीच्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. म्हत्वाचे म्हणजे, कर्तव्यपथावर कार्यक्रमाची तयारीही सुरू झाली आहे. 

माध्यमांतील वृत्तांनुसार, निवडणूक निकाल NDAच्या बाजूने आल्यास, 9 जूनला शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. यावेळी राष्‍ट्रपती भवनाच्या मैदाना ऐवजी कर्तव्‍य पथावर या समारंभाचे आयोजन करण्याची NDA ची इच्छा आहे.‘हिंदुस्‍तान टाइम्‍स’ने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक निकाल आल्यानंतर, कर्तव्‍य पथावरील शपथविधीच्या कार्यक्रमाला अंतिम रूप देण्यात येईल. यासंदर्भात 24 मेरोजी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या विंगमध्ये एक बैठकही झाली. या बैठकीला ऑल इंडिय रेडिओ आणि दूरदर्शनचे अधिकारीही उपस्थित होते. यात शपथविधी समारंभाच्या कव्हरेज संदर्भात चर्चा झाली.

कर्तव्‍य पथच का? -आता प्रश्न असा निर्माण होतो की, शपथविधी सारख्या एवढ्या मोठ्या आणि महत्‍वाच्या समारंभासाठी कर्तव्‍य पथच (आधीचे राजपथ) पहली पसंती का? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी NDA अशा जागेच्या शोधात आहे, ज्या ठिकाणी अधिकाधिक लोक या समारंभाचे साक्षिदार होऊ शकतील. तसेच देश आणि जगाला विकसित भारताचे दर्शनही होऊ शकेल. 

महत्वाचे म्हणजे, कर्तव्य पथ हा महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचा सेंटरपीस आहे. या प्रोजेक्टचे बांधकामही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे, त्यामुळे येथे शपथविधी सोहळा आयोजित केल्यास विकसित भारताची झलक लोकांना पाहता येणार आहे. दुसरे मोठे कारण म्हणजे, कर्तव्‍य पथावर अधिकाधिक लोक एकत्र येऊ शकतील.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी