Yati Narsinghanand Saraswati: जर मुस्लीम पंतप्रधान झाला तर 50 टक्के हिंदूंचं होईल धर्मांतरण; यती नरसिंहानंद यांचं वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 22:43 IST2022-04-03T22:42:24+5:302022-04-03T22:43:20+5:30
ते म्हणाले, 'वर्ष 2029 किंवा 2034 अथवा 2039 मध्ये मुस्लीम पंतप्रधान होईल. जर एकदा का मुस्लीम पंतप्रधान झाला तर पुढच्या 20 वर्षांत 50 टक्के हिंदूचे धर्मांतरण होईल, 40 टक्के हिंदूंची हत्या होईल आणि उरलेले 10 टक्के निर्वासितांच्या शिबिरांत अथवा दुसऱ्या देशांत असतील.

Yati Narsinghanand Saraswati: जर मुस्लीम पंतप्रधान झाला तर 50 टक्के हिंदूंचं होईल धर्मांतरण; यती नरसिंहानंद यांचं वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली - वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले गाझियाबाद येथील डासना देवी मंदिराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद यांनी रविवारी आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. जर एखादा मुस्लीम व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला तर 20 वर्षांत 50 टक्के हिंदूंचे धर्मांतरण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
हिंदू महापंचायतीचे आयोजन -
दिल्ली प्रशासनाच्या परवानगीशिवाय आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदू महापंचायती'ला संबोधित करताना नरसिंहानंद यांनी हिंदूंना त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी कथितपणे शस्त्रे उचलण्याचे आवाहनही केले. ही महापंचायत बुराडी मैदानावर ज्या संघटनेने आयोजित केली होती. त्याच संघटनेने यापूर्वी हरिद्वार आणि दिल्लीच्या जंतरमंतर वरही अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तेव्हाही तेथे कथित मुस्लीम विरोधी घोषणाबाजीही झाली होती.
जामिनावर बाहेर आहेत नरसिंहानंद स्वामी -
बुराडी मैदानावर रविवार आयोजित या या कार्यक्रमात हिंदू श्रेष्ठत्वाची भावना असलेले अनेक नेते सामील झाले होते. नरसिंहानंद हरिद्वारच्या घटनेप्रकरणी सध्या जामिनावर आहेत.
असं असेल हिंदूंचं भविष्य? -