तर मुंडेंचा जीव वाचला असता - डॉ.हर्षवर्धन
By Admin | Updated: June 4, 2014 17:16 IST2014-06-04T17:16:37+5:302014-06-04T17:16:54+5:30
गाडीतून प्रवास करताना सीटबेल्ट लावला असता तर गोपीनाथ मुंडेंचा जीव वाचू शकला असता अशी भावना आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केली.

तर मुंडेंचा जीव वाचला असता - डॉ.हर्षवर्धन
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ४ - गाडीतून प्रवास करताना सीटबेल्ट लावला असता तर गोपीनाथ मुंडेंचा जीव वाचू शकला असता अशी भावना आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केली. मुंडे यांच्या अंत्यदर्शनासाठी बीड येथे जाण्यापूर्वी बोलताना त्यांनी सुरक्षित वाहतुकीसाठी आणखी सजगता निर्माण करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले.
गाडीतील मागच्या सीटवरील बेल्ट्स फक्त शोभा वाढवण्यासाठी नसतात. पुढच्या सीटवर बसणा-यांनी सीट-बेल्ट लावणे जसं आवश्यक आहे, तसेच मागे बसणा-यांनीही तो लावणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसे न केल्यास घातक परिणामांना समोरे जाण्याची वेळ येते असेही त्यांनी सांगितले. मुंडे यांच्या निधनामुळे देशाला मोठा फटका बसल्याचीही प्रतिक्रियाही त्यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे (वय ६५) यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत अपघाती निधन झाले