शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

मोदींचे सरकार आल्यास भाजप मंत्र्यांचा कोटा कमी होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 4:49 AM

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संभाव्य सरकारमध्ये बिहारमधील भाजपच्या काहींना मंत्रीपद गमवावे लागेल.

संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मतदार कौल कोणाला मिळतो? कोणाचे किती खासदार आणि सरकार कोणाचे येईल? याचा फैसला गुरुवारी सायंकाळपर्यंत होणार आहे. तथापि, मतदानोत्तर चाचणीच्या निष्कर्षानुसार केंद्रात पुन्हा मोदींचे सरकार आल्यास सरकारमधील भाजपा वाटा कमी होऊ शकतो. जेडीयू, शिवसेनेला प्राधान्य देण्यासोबतच ईशान्येकडील आघाडीला प्राथमिकता देण्यासाठी भाजपवर दबाव असेल. त्यामुळे बिहारच्या काही मंत्र्यांची पुन्हा वर्णी लागणार नाही.

भाजपच्या सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयात मंत्र्यांशी चर्चा करतांना स्पष्ट केले की, येथे उपस्थित असलेल्यांपैकी काही सहकाऱ्यांना नवीन मंत्रिमंडळात घेऊ शकणार नाही; म्हणजे त्यांना दुर्लक्षित केले जाईल, असा याचा अर्थ नाही. त्यांचे पक्षासाठीचे समर्पण आणि बांधिलकी निश्चितच लक्षात घेतली जाईल.

भाजपप्रणित राष्टÑीय लोकशाही आघाडीच्या संभाव्य सरकारमध्ये बिहारमधील भाजपच्या काहींना मंत्रीपद गमवावे लागेल. जेडीयूने चार ते पाच खासदारांप्रती एक मंत्रीपद हे सूत्र लागू करण्याचे सूचित केले आहे. महाराष्टÑातूनही शिवसेनेचा दबाव असेल. मागच्या सरकारमध्ये अपेक्षेप्रमाणे मंत्रीपदे न मिळाल्याने शिवसेना नाराजी व्यक्त करीत होती. या दबावामुळेच लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी स्वत:ऐवजी पूत्र चिराग पासवान यांना मंत्री करु, असे मत उघडपणे व्यक्त केले होते. आधीप्रमाणे एकच मंत्रीपद मिळेल, स्वत: की मुलाला मंत्री करणार, हे त्यांनी ठरवावे, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच त्यांना मिळाले असावेत.

प. बंगाल, दिल्ली तसेच ओडिशाला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व देण्यासाठीही दबाव असेल. परिणाम बिहारमधील भाजपच्या मंत्र्यांची संख्या कमी होऊ शकते. एक किंवा दोन मंत्र्यांना सरचिटणीसपद देऊन त्यांचे समायोजन केले जाण्याची शक्यता आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९