...तर मोदींना झोपही लागत नाही - राहुल गांधी

By Admin | Updated: February 9, 2017 19:44 IST2017-02-09T19:40:42+5:302017-02-09T19:44:39+5:30

माजी पंतप्रधानांविषयी सभ्यपणे बोलू न शकणारे मोदी हे देशातील कदाचित पहिलेच पंतप्रधान असतील. ते प्रसिद्धीला

... if Modi does not sleep - Rahul Gandhi | ...तर मोदींना झोपही लागत नाही - राहुल गांधी

...तर मोदींना झोपही लागत नाही - राहुल गांधी

>ऑनलाइन लोकमत
देहराडून, दि. 9 - माजी पंतप्रधानांविषयी सभ्यपणे बोलू न शकणारे मोदी हे देशातील कदाचित पहिलेच पंतप्रधान असतील. ते प्रसिद्धीला हापापलेले आहेत, ज्या दिवशी त्यांच्यावरील बातमीची चर्चा होत नाही, त्या दिवशी त्यांना नीट झोपही लागत नाही असा टोला लगावत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीप्पणीचा समाचार घेतला. 
बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला  अवगत असणारे मनमोहन सिंग हे एकमेव व्यक्ती आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेत केली होती. मोदींच्या त्या टीप्पणीवर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. आता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तराखंडमधील प्रचारसभेत मोदींच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
राहुल गांधी म्हणाले, मोदी हे कदाचित असे पहिले पंतप्रधान असतील, जे आधीच्या  पंतप्रधानांविषयी सभ्यपणे बोलू शकत नाहीत. त्यांना शिकण्याची गरज आहे. मोदींची कमजोरी म्हणजे ते प्रसिद्धीला हापापलेले आहेत. त्यांना चर्चेत राहायला आवडते. जर एखादे दिवशी त्यांची बातमी आली नाही, तर ते अस्वस्थ होतात. त्या रात्री त्यांना झोपदेखील येत नाही. 
 मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टीका ही देशातील प्रत्येक नागरिकावर केलेली टीका आहे. असेही राहुल गांधी म्हणाले. त्याबरोबरच उत्तराखंडमध्ये आलेल्या भूकंपावरही मोदींनी विनोद केला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

Web Title: ... if Modi does not sleep - Rahul Gandhi