शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा फायदा होणार असल्यास वाराणसीतून लढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 07:21 IST

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद; मायावती, अखिलेश भाजपचे एजंट

नवी दिल्ली : वाराणसीतील उमेदवारीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फायदा होणार असेल तर ही लोकसभा निवडणूक मी लढविणार नाही, असे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी बुधवारी जाहीर केले आहे. अखिलेश यादव व मायावती हेच भाजपचे एजंट असल्याचा आरोपही त्यांनी केला.

चंद्रशेखर आझाद हे भाजपचे एजंट असून वाराणसीमध्ये दलितांच्या मतांची विभागणी व्हावी यासाठीच ते तिथून निवडणूक लढवत आहेत, असा आरोप बसपच्या प्रमुख मायावती यांनी नुकताच केला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, दलितांवर अत्याचार करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनाच सपचे प्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बढती दिली होती. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे विधान माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी संसदेत केले होते. यावरून सिद्ध होईल की मी नव्हे तर हे सारे लोकच भाजपचे एजंट आहेत.

चंद्रशेखर आझाद म्हणाले की, काही जण माझा उल्लेख एजंट म्हणून करतात. हो, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा एजंट आहे. जर माझेच लोक मार्गात आडवे आले नसते तर अखिलेश यादव यांना मी दाखवून दिले असते की, जर आम्ही तुम्हाला विजयी करू शकतो तर पराभवाची धूळही चारू शकतो. बसपतील सरचिटणीस व त्या पक्षातील ब्राह्मण नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी माझ्याबाबत मायावतींची दिशाभूल केली आहे.‘मलाच पाठिंबा द्या’वाराणसी लोकसभा मतदारसंघातील माझ्या उमेदवारीला सप व बसपने पाठिंबा दिल्यास दलितांच्या मतांची विभागणी टळेल असेही ते म्हणाले. वाराणसीमध्ये मोदी यांच्या विरोधात सप-बसप-रालोद आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

टॅग्स :Bhim Armyभीम आर्मीChandrashekhar Azadचंद्रशेखर आझादNarendra Modiनरेंद्र मोदी