शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुठभर उद्योगपतींची कर्जे माफ होत असतील तर शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्यावी लागेल - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 16:47 IST

शेतीतील विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी राजधानीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.  

ठळक मुद्देशेतीतील विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी राजधानीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केलीजर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 15 निकटवर्तीय मित्रांची कर्जे माफ करू शकतात, तर मग देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची कर्जेही त्यांनी माफ केली पाहिजेतदेशाच्या कानाकोपऱ्यातून रामलीला मैदानावर आलेले शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत.  या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा 208 संघटनांचे सदस्य शेतकऱ्यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - शेतीतील विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी राजधानीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.  जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 15 निकटवर्तीय मित्रांची कर्जे माफ करू शकतात, तर मग देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची कर्जेही त्यांनी माफ केली पाहिजेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी आज दुपारी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर येथे आलेल्या हजारो शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबानी आणि अदानी यांच्यात देश वाटून टाकला आहे. जर 15 धनाढ्य लोकांचे कर्ज माफ होत असेल, तर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे. शेतकरी तुमच्याकडे कुठलीही फुकटची भेट मागत नाही आहेत. ते आपला हक्क मागत आहेत. मोदींनी हमीभाव, विमा आदींबाबत आश्वासने दिली होती. मात्र आता ते केवळ पोकळ भाषणे देत आहेत.''यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. मोदींच्या काळात सीमेवर जवान आणि देशात शेतकरी दु:खी आहे. आता सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू न केल्यास हे सरकारविरोधात कहर करतील, असे केजरीवाल म्हणाले.  देशाच्या कानाकोपऱ्यातून रामलीला मैदानावर आलेले शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत.  या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा 208 संघटनांचे सदस्य शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सरकार शेतकऱ्यांचे हित पाहत नाही. साखर कारखाने ठरल्याप्रमाणे पैसे देत नाहीत. उत्पादन खर्च वाढला आहे. कृषी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असा आक्रोश शेतकरी संघटनांचा आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी दिल्लीतील डॉक्टर, वकील, प्राध्यापक, कलाकार मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. नेशन फॉर फार्मरच्या सहाशे ते सातशे स्वयंसेवकांनी शेतकऱ्यांना साथ देत रामलीला मैदानाच्या दिशेने पायी कूच केली. यातील काही डॉक्टरांनी शेतकऱ्यांसाठी मैदानावर आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालNew Delhiनवी दिल्लीIndiaभारत