जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला नाही तर...; फारूक अब्दुल्लांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 00:16 IST2022-11-04T00:15:05+5:302022-11-04T00:16:47+5:30
पक्षाकडून बुधवारी विधानसभा मतदारसंघांच्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पक्ष कार्यकर्ते सक्रीय राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे

जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला नाही तर...; फारूक अब्दुल्लांची मोठी घोषणा
श्रीनगर : जर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला नाही, तर उमर अब्दुल्ला विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, असे नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी सांगितले. बडगाम जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना अब्दुल्ला म्हणाले, "जोपर्यंत जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल होत नाही, तोपर्यंत निवडणूक लढवणार नाहीत, असे ओमर अब्दुल्ला यांनी आधीच सांगितले आहे."
विधानसभा निवडणुकीत उमर अब्दुल्ला मैदानात उतरणार नाहीत, असे अंदाज लावले जात होते. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना फारुक अब्दुल्ला यांनी उत्तर दिले. तसेच, पक्षाकडून बुधवारी विधानसभा मतदारसंघांच्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पक्ष कार्यकर्ते सक्रीय राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
नॅशनल कॉन्फरन्सने नियुक्त केलेल्या विधानसभा मतदार संघांच्या प्रभारींना विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी पक्षाची परवानगी मिळेल. असा अंदाज वर्तावला जात होता. मात्र, हा अंदाज फारुक अब्दुल्ला यांनी फेटाळून लावला आहे. उब्दुल्ला म्हणाले, अद्याप कुणालाही उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. जम्मू-काश्मिरात अद्याप विधानसभा निवडणुकीला वेळ आहे. कशा प्रकारचे समिकरण बनते, हे निवडणूक लागल्यानंतरच स्पष्ट होईल.