'इफ्तारी चालते तर रामनवमी का नाही'?; जादवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ममता सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:23 IST2025-04-04T15:21:45+5:302025-04-04T15:23:03+5:30
जादवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगाल येथील सरकारला सवाल उपस्थित केले आहेत.

'इफ्तारी चालते तर रामनवमी का नाही'?; जादवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ममता सरकारला सवाल
पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी ममता सरकारला कोंडीत पकडले आहे. विद्यापीठात इफ्तार पार्टी मोठ्या जल्लोषात साजरी होत असेल तर मग एक दिवस रामनवमी का साजरी होत नाही?, असा सवाल विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालच्या राज्य सरकारला केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
कोलकाता येथील जादवपूर विद्यापीठामध्ये रामनवमी साजरी करण्याचा मानस हिंदू विद्यार्थी संघ आणि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. पण, आता जादवपूर विद्यापीठाने कॅम्पसमध्ये रामनवमी उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यास नकार दिला आहे.
पत्नीच्या हत्येसाठी पती दीड वर्षे तुरुगांत; पाच वर्षांनी प्रियकरासोबत नाश्ता करताना सापडली महिला
कुलगुरूंसोबत बैठक झाली
३ एप्रिल रोजी जादवपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीत उपस्थित असलेल्या सदस्यांनी २८ मार्च रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिलेला अर्ज फेटाळून लावला. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये रामनवमी उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली होती. नकाराची दोन कारणे देण्यात आली. एक गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी अशी परवानगी देण्यात आली नव्हती. दुसरे म्हणजे, सध्या कुलगुरू उपस्थित नसल्याने असा नवीन निर्णय घेता येत नाही, असं सांगण्यात आले होते.
बुधवारी विद्यार्थी आणि रामनवमी उत्सवाचे आयोजकांनी सांगितले की, यावर्षी कॅम्पसमध्ये रामनवमी साजरी करण्याचा त्यांचा निर्धार आहे. काही दिवसांपूर्वी कॅम्पसमध्ये इफ्तार पार्टीला परवानगी देण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयावरही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले.
रामनवमीचे आयोजक सोमसूर्या बॅनर्जी म्हणाले की, आम्ही या वर्षी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रामनवमी साजरी करणार आहे. आम्ही या वर्षी पाठीमागे हटणार नाही. जर लोक विद्यापीठात इफ्तार साजरी करु शकतात तर मग आम्ही रामनवमी साजरी का करु शकत नाही? आम्ही कायद्याने पुढे जाणार आहे आणि जो कोणी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करेल त्याच्याविरोधात कारवाई करणार, असंही ते म्हणाले.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य म्हणाले, 'ABVP हा कार्यक्रम आयोजित करत आहे पण आम्ही त्यांना कॅम्पसमध्ये रामनवमी साजरी करू देणार नाही.