शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदू हिंसक असते तर...", दोन वर्षांनंतर सार्वजनिक व्यासपीठावरून नुपूर शर्मा स्पष्टच बोलल्या? बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 20:53 IST

त्यांनी गाझियाबादमधील रामप्रस्थ ग्रीन कॅम्पस येथे आयोजित भागवत कथेदरम्यान, अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. यावेळी, या देशात सनातनींना संपविण्याचे षडयंत्र रचले गेले, जे आपण अनुभवले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

साधारणपणे दोन वर्षांपूर्वी आपल्या एका वादग्रस्त विधानानंतर, राजकीय पटलावरून जवळपास गायब झालेल्या भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनी अखेर मौन सोडले आहे. त्यांनी गाझियाबादमधील रामप्रस्थ ग्रीन कॅम्पस येथे आयोजित भागवत कथेदरम्यान, अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. यावेळी, या देशात सनातनींना संपविण्याचे षडयंत्र रचले गेले, जे आपण अनुभवले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधींचे नाव न घेता नुपूर म्हणाल्या, "जेव्हा एखाद्या उच्च पदावरी लोक हिंदू हिंसक आहेत, असे बोलतात अथवा सनातना नष्ट करायला हवे, असे इतर काही लोक बोलतात, तेव्हा हे षड्यंत्र समजायला हवे. जर हिंदू हिंसक झाले असते, तर आपल्याच देशात एका हिंदू मुलीला एवढ्या सुरक्षा व्यवस्थेत रहावे लागले नसते. ते काही बोलले, तर 'वाह-वाह' आणि मी काही बोलले तर 'सिर तन से जुदा', असे चालणार नाही. आपला देश आपल्या संविधानाने चलेल, कुठल्याही धर्माच्या कायद्याने अथवा शरिया कायद्याने चालणार नाही."

तत्पूर्वी, 1 जुलैला लोकसभेमधील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले होते, "भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी भीऊ नका आणि कुणाला घाबरू नका, असा संदेश दिला आहे. शिव शंकर म्हणतात, भिऊ नका, घाबरवू नका. तर दुसरीकडे, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा... द्वेष-द्वेष-द्वेष... आपण  हिंदू नाहीच. सत्याच्या बाजूने उभे रहायला हवे, असे हिंदू धर्मात स्पष्ट शब्दात लिहिले आहे."

राहुल गांधींच्या या वक्त्यवावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहून हे गंभीर असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले होते, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर गोष्ट आहे. यावर पुन्हा राहुल गांधी म्हणाले होते, पंतप्रधान मोदी आणि भाजप म्हणजे, संपूर्ण हिंदू समाज नाही.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीHinduहिंदूlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी