शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आज निवडणुका झाल्या तर कुणाला मिळेल सत्ता?; जाणून घ्या, देशातील जनतेचा कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 21:41 IST

आज निवडणुका झाल्या तर निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, या प्रश्नावर जनतेने कौल दिला

नवी दिल्ली - इंडिया टूडे-सी वोटरनं एकत्र येत मूड ऑफ द नेशन सर्व्हे केला आहे. ज्यात NDA सरकारच्या कामावर देशातील जनतेचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जानेवारी २०२३ रोजी केलेल्या सर्व्हेत एकूण १ लाख ४० हजार ८१७ लोकांनी सहभाग घेतला. त्यात अनेक ज्वलंत प्रश्नावर लोकांनी मते व्यक्त केली. मोदी सरकारच्या एकूण कामगिरीवर किती समाधानी आहात? आज जर निवडणुका झाल्या तर देशात कुणाचं सरकार बनेल? NDA सरकारचं सर्वात मोठं यश आणि अपयश काय आहे. जाणून घेऊया या सर्व्हेत लोकांनी काय मत व्यक्त केलीत. 

NDA सरकारच्या कामावर लोकांनी पसंती व्यक्त केली आहे. ६७ टक्के लोकांनी खूप चांगले, ११ टक्के लोकांनी फक्त चांगले आणि १८ टक्के लोकांनी खराब कामगिरी असल्याचं म्हटलं आहे. लोकांनी कोरोनाच्या लढाईत मोदी सरकारने केलेल्या कामाचं कौतुक केले आहे. २० टक्के लोकांचे म्हणणं आहे की मोदी सरकार कोरोनाच्या लढाईत यशस्वी झाले. तर कलम ३७० हटवणे १४ टक्के, राम मंदिर बांधकाम ११ टक्के आणि जन कल्याण योजनेवर ८ टक्के लोकांनी यशस्वी कामगिरी म्हटली आहे. 

मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश?त्याचवेळी सर्वात मोठे अपयश या प्रश्नावर २५ टक्के लोकांनी महागाई सांगितली आहे. १७% बेरोजगारी, ८% कोविड-१९शी संबंधित, ६% लोकांनी आर्थिक विकास सांगितले.

विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसच्या कामावर तुम्ही किती खूश आहात?विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या कार्यपद्धतीबाबतही जनतेला विचारण्यात आले आहे. यामध्ये १९ टक्के लोकांनी खूप चांगले, १५ टक्के चांगले, १९ टक्के सरासरी आणि २५ टक्के वाईट म्हटले आहे.

भारत जोडो यात्रेबद्दल काय मत आहे?भारत जोडो यात्रेबाबतही लोकांनी मते दिली आहेत. २९ टक्के लोकांनी जनतेशी संपर्क साधण्याचा हा चांगला निर्णय असल्याचं म्हटलं आहे. ३७ टक्के लोकांनी पक्ष मजबूत करण्यासाठी ठीक असल्याचं सांगितले. १३ टक्के लोकांनी राहुल गांधींची प्रतिमा सुधारण्यासाठी पावले उचलल्याचे सांगितले. त्याचवेळी ९ टक्के लोकांनी पक्षाला काही फरक पडणार नसल्याचे सांगितले.

आज निवडणुका झाल्या तर निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, या प्रश्नावर जनतेने कौल दिला. भाजपला २८४, काँग्रेसला ६८ आणि इतरांना १९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपला ३९ टक्के, काँग्रेसला २२ आणि इतरांना ३९ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस