शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एका पैशाचा जरी भ्रष्टाचार सापडला, तर जाहीर फाशी द्या...; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 00:02 IST

wait what arvind kejriwal dares pm modi to hang him if corruption charges proves

मी पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो की, केजरीवाल भ्रष्ट असेल, तर जगात कुणीच प्रामाणिक नाही. आपल्याला माझ्या विरोधात एका पैशाचा जरी भ्रष्टाचार सापडला, तर मला जाहीर फाशी द्या. पण हा रोजचा तमाशा बंद करा, असे आव्हान देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. एवढेच नाही, तर केंद्र सरकारने आपल्या मागे, आपण चोर आहोत हे सिद्ध करण्यासाठी तपास संस्था लावल्या आहेत, असेही जरीवाल यांनी म्हटले आहे. पंजाबमधील लुधियानामध्ये 80 आम आदमी क्लिनिक समर्पित केल्यानंतर ते बोलत होते.  

केजरीवाल म्हणाले, त्यांनी (केंद्र सरकारने) सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स आणि पोलिसांना माझ्या मागे लावले आहे. का? तर, कुठल्याही प्रकारे हे सिद्ध करायचे आहे की, केजरीवाल चोर आहे. हे सिद्ध करायचे आहे की, तो भ्रष्टाचारात सामील आहे.

सीबीआयनं केली केजरीवालांची चौकशी -दिल्ली अबकारी धोरणप्रकरणी सीबीआयने केजरीवालांची चौकशी केली होती. या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आधीपासूनच कारागृहात आहेत. यावर, पंतप्रधानांना आव्हान देत केजरीवाल म्हणाले, 'मी पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो की, जर केजरीवाल भ्रष्ट आहे, तर या जगात कुणीच प्रमाणिक नाही. ज्या दिवशी आपल्याला केजरीवाल विरोधात एका पैशाचाही भ्रष्टाचार दिसेल, मला जाहीर फाशी द्या. पण ही रोजचीच नौटंकी बंद करा आणि तमाशा बंद करा.

केजरीवाल म्हणाले, पंजाबमध्ये लोकांना क्वॉलिटी सर्व्हिस देणाऱ्या आम आदमी क्लिनिकची संख्या आता 580 वर पोहोचली आहे. आबकारी धोरणप्रकरणात सीबीआयने केजरीवाल यांची 16 एप्रिलला चौकशी केली होती. एजन्सीने केजरीवाल यांना साक्षीदार म्हणून बोलावले होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAam Admi partyआम आदमी पार्टी