शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

काँग्रेसची सत्ता आल्यास ‘सीएए’ लागू करणार नाही, राहुल गांधी यांची आसाममध्ये घाेषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 07:37 IST

Rahul Gandhi in Assam : आसाममध्ये एका प्रचारसभेत राहुल गांधी म्हणाले, आम्ही गळ्यात घातलेल्या रुमालावर ‘सीएए’ लिहिले आहे. त्यावर क्राॅस केलेले आहे. हा कायदा काहीही झाले तरी आम्ही लागू हाेऊ देणार नाही.

गुवाहाटी : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीएए) आसाममध्ये हाेत असलेल्या विराेधाचा धागा पकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माेदी सरकारला लक्ष्य केले. आसाममध्येकाँग्रेसची सत्ता आल्यास ‘सीएए’ कायदा लागू करणार नसल्याचे जाहीर केले.आसाममध्ये मार्च- एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यादृष्टीने आसामच्या नागरिकांसाठी कळीचा मुद्दा असलेल्या विषयाला राहुल गांधी यांनी हात घातला. आसाममध्ये एका प्रचारसभेत राहुल गांधी म्हणाले, आम्ही गळ्यात घातलेल्या रुमालावर ‘सीएए’ लिहिले आहे. त्यावर क्राॅस केलेले आहे. हा कायदा काहीही झाले तरी आम्ही लागू हाेऊ देणार नाही. ‘हम दाे, हमारे दाे’वाल्यांनी हे नीट ऐकून घ्यावे, असा इशारा त्यांनी दिला. आसाममधील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनाही किमान भत्ता वाढवून देण्याचेही आश्वासन दिले. गुजरातमधील व्यापाऱ्यांकडून हा पैसा येईल. कारण मळ्यांची मालकी त्यांच्याकडे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आसामला आसामचाच मुख्यमंत्री हवा असल्याचेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. याशिवाय आसाम कराराचेही काटेकाेरपणे पालन करू, असेही राहुल गांधी म्हणाले.  (वृत्तसंस्था)

‘सीएएची अंमलबजावणी केरळात नाही’- नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याची (सीएए) अंमलबजावणी केरळ करणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी थिरूवनंतपुरम येथे केला. - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोविड-१९ लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाली की सीएएची अंमलबजावणी केली जाईल, असे विधान केल्यावर विजयन यांनी माकपच्या राज्यपातळीवरील दौऱ्याचे उद्घाटन करताना म्हटले की, “आम्ही सीएएबद्दलची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. आमचे सरकार सीएएसारखा कायदा राबवू देणार नाही.” - गुरुवारी शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सभेत बोलताना म्हटले होते की, देशात काेरोनाचा फैलाव झाल्यामुळे सीएएची अंमलबजावणी स्थगित केली होती. कोविड-१९ लसीकरण प्रक्रिया पूर्ण होताच सीएएअंतर्गत नागरिकत्व बहाल करण्यास सुरुवात होईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAssamआसामcongressकाँग्रेस