...तर कार्निव्हल बेतला असता जिवावर!
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:44+5:302015-02-14T23:51:44+5:30
पणजी : कार्निव्हल साजरा होत असताना पणजीतील गार्सिया द ऑर्ता उद्यानात ३ मुले विहिरीत पडली; परंतु तत्काळ त्यांना काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

...तर कार्निव्हल बेतला असता जिवावर!
प जी : कार्निव्हल साजरा होत असताना पणजीतील गार्सिया द ऑर्ता उद्यानात ३ मुले विहिरीत पडली; परंतु तत्काळ त्यांना काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पणजीतील चर्च स्क्वेअरजवळील या उद्यानात कार्निव्हलची धामधूम सुरू असताना एका बाजूला उद्यानातील विहिरीशेजारी काही मुले खेळत होती. त्यांचे पालकही तिथेच बसले होते. विहिरीच्या कठड्याकडे धावलेली तीन मुले अचानक खाली पाण्यात पडली. पालकांनी जराही वेळ न दवडता विहिरीत उतरून मुलांना वर काढले, अशी माहिती तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी दिली. मुलांना कोणतीही गंभीर इजा न झाल्याची माहिती देण्यात आली.विहिरीत मुले पडल्यानंतर काहींनी त्वरित अग्निशामक दलाला फोन केला. त्यामुळे अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले; परंतु त्यापूर्वीच मुलांच्या पालकांनी त्यांना वर काढले होते, अशी माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली. पणजी पोलीस स्थानकातील पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.