शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Jharkhand Bomb Blast:धक्कादायक...निवडणूक काळात पेरलेला बाँम्ब आज फुटला; 11 जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 10:53 IST

गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांवर कारवाई करण्याऱ्या पथकांवर बॉम्बहल्ले केले जात आहेत.

सराईकेला : लोकसभा निवडणुकीवेळी नक्षलवाद्यांनी पेरलेला आयईडी बॉम्ब आज कोब्रा जवान आणि झारखंड पोलिसांच्या तुकडीजवळ फुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या स्फोटामध्ये कोब्रा बटालियनचे 8 तर पोलिसांचे 3 जवान जखमी झाले आहेत. यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांवर कारवाई करण्याऱ्या पथकांवर बॉम्बहल्ले केले जात आहेत. गेल्या महिन्यात गडचिरोलीमध्येही असाच भूसुरुंग स्फोट घडवून जवानांचे वाहन उडवून देण्यात आले होते. अशाचप्रकारचा हल्ला आज पहाटे 4.53 च्या सुमारास झारखंडच्या कुचाई भागात करण्यात आला आहे. झारखंडच्या सराईकेला येथे हा स्फोट झाला. पोलिस महासंचालक डी के पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आयईडी बॉम्ब निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्यासाठी पेरण्यात आला होता. हा परिसर साफ करण्यासाठी कोब्रा जवान आणि पोलिसांची संयुक्त तुकडी काम करत होती. यावेळी या बॉम्बचा स्फोट झाला. 

यामध्ये कोब्रा बटालियनचे 8 जवान आणि पोलिसांचे 3 जवान जखमी झाले आहेत. या सर्वांना सकाळी 6.52 मिनिटांनी रांचीमधील हॉस्पिटलमध्ये हेलिकॉप्टरद्वारे नेण्यात आले आहे. यापैकी तीन जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पांडे यांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीBombsस्फोटकेJharkhandझारखंड