शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Jamia Firing : मोदीजी, 'त्याला' त्याच्या कपड्यांवरुन ओळखा; ओवेसींचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 21:15 IST

Jamia Firing : जामियाच्या विद्यार्थ्यावर झालेल्या गोळीबारावरुन असदुद्दीन ओवेसींची सरकारवर जोरदार टीका

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर एका व्यक्तीनं दुपारच्या सुमारास गोळीबार केला. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतानाही गोळीबार झाल्यानं विरोधकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या सभेत झालेल्या प्रक्षोभक घोषणांमुळेच जामिया परिसरात हिंसाचार झाल्याचा आरोप एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी केला आहे.   'अनुराग ठाकूर आणि रात्री ९ वाजता टीव्हीवर झळकणाऱ्या सर्व राष्ट्रवादी मंडळींचे आभार. या मंडळींनी देशात इतका द्वेष निर्माण केला आहे की एक दहशतवादी पोलिसांसमोर विद्यार्थ्यावर गोळी झाडत आहे,' अशा शब्दांत ओवेसींनी भाजपावर निशाणा साधला आहे. मोदींनी गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कपड्यांवरुन ओळखावं, असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे. 'सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना, हिंसक झालेल्यांना कपड्यांवरुन ओळखता येतं,' असं मोदींनी १५ डिसेंबर रोजी झारखंडमधल्या दुमकामध्ये प्रचारादरम्यान म्हटलं होतं. त्यावरुन ओवेसींनी मोदींना लक्ष्य केलं आहे. असदुद्दीन ओवेसींनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. जामिया विद्यापीठात गेल्या महिन्यात शौर्य दाखवणाऱ्या पोलिसांना आता नेमकं काय झालंय?, असा सवाल ओवेसींनी विचारला आहे. बघ्याची भूमिका पार पाडण्यासाठी एखादा पुरस्कार असल्यास दिल्ली पोलीस कायम तो जिंकतील, अशा शब्दांत ओवेसींनी पोलिसांची खिल्ली उडवली. ओवेसींनी गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा फोटोदेखील ट्विट केला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला बॅरिकेडवर चढून का जावं लागतं? तुमच्या सेवेचे नियम तुम्हाला माणूस होण्यापासून रोखतात का?, असे प्रश्न ओवेसींनी विचारले आहेत. 

टॅग्स :jamia protestजामियाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा