शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबाद विमानतळ 45 मिनिटांसाठी बंद राहणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 11:03 AM

Ahmedabad Airport : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय (SVPI) विमानतळाने शनिवारी रात्री एक निवेदन जारी केले आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दरम्यान, अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय (SVPI) विमानतळाने शनिवारी रात्री एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये प्रवाशांना सांगण्यात आले आहे की, विश्वचषक सामन्यापूर्वी अहमदाबादमध्ये भारतीय वायुसेनेचा एअर शो होणार आहे, ज्यासाठी दुपारी 1:25 ते 2:10 या वेळेत एअरस्पेस बंद ठेवण्यात येणार आहे.

विमानतळाने जारी केलेल्या निवेदनात, प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, जर ते SVPI विमानतळावरून प्रवास करत असतील तर प्रवासाशी संबंधित औपचारिकता आणि सुरक्षा प्रोटोकॉलसाठी अतिरिक्त वेळ घेऊन घरातून निघावे. तसेच, प्रवास प्रक्रियेसाठी अतिरिक्त वेळ देऊन निघून जा. 17 आणि 19 नोव्हेंबर रोजी 1:25 ते 2:10 पर्यंत एअरस्पेस बंद राहील. तुमची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद, असे निवेदनात म्हटले आहे.

याचबरोबर, विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक असणार आहे, असे अहमदाबाद विमानतळाकडून सांगण्यात आले आहे. विमानतळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी टर्मिनल आणि लँडसाइडमधील सर्व सुरक्षा पथके प्रवाशांच्या वाढत्या संख्येसाठी स्टँडबायवर ठेवण्यात आली आहेत. अंतिम सामन्यादरम्यान रात्रीच्या पार्किंगसाठी विमानतळावर त्वरित 15 स्टँड उपलब्ध आहेत, त्यापैकी सहा व्यावसायिक जेट विमानांच्या ऑपरेशनसाठी उपलब्ध आहेत.

दरम्यान, अहमदाबाद विमानतळाचे एअरस्पेस बंद होणार असल्यामुळे आकासा एअरने प्रवाशांसाठी एक स्वतंत्र निवेदन जारी केले आहे. यामध्ये प्रवाशांना सांगण्यात आले आहे की, गुजरातहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या फ्लाइट्सला उशीर होण्याची शक्यता आहे. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांमुळे विमानतळावर जास्त  ट्रॅफिक असणार असल्याचे एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या उड्डाणाच्या तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :ICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपahmedabadअहमदाबादAirportविमानतळairplaneविमान