शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

'दलित'ऐवजी या शब्दाचा वापर करावा, केंद्र सरकारची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 15:29 IST

मीडियानं 'दलित' शब्दाऐवजी अनुसूचित जाती व जमाती या शब्दाचा वापर करावा, अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिली आहे.

नवी दिल्ली -  मीडियानं 'दलित' शब्दाऐवजी अनुसूचित जाती व जमाती या शब्दाचा वापर करावा, अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, दलितांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या संघटनांनी मात्र माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. दलित हा शब्द केवळ ओळखच नाही तर राजकीयदृष्ट्यादेखील अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे, असे मत दलित संघटनांनी मांडले आहे. 

पंकज मेश्राम यांच्या याचिकेवर जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला होता. दलित शब्दाचा वापर टाळण्याचा प्रयत्न करावा आणि याबाबतचे निर्देश सर्व खासगी वाहिन्यांना देण्याबाबत विचार केला जावा असे खंडपीठाने म्हटले होते. त्यानुसार 7 ऑगस्टला सर्व खासगी वाहिन्यांना पत्र पाठवण्यात आले.  

मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही 15 जानेवारी रोजी एका निकालात अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या व्यक्तींसाठी दलित शब्द वापरता येणार नसल्याचे म्हटले होते. सरकारी कामकाजादरम्यान केवळ अनुसूचित जाती या शब्दाचा प्रयोग करण्यात यावा, असे निर्देस यापूर्वी केंद्र सरकारकडून देण्यात आले आले होते. कारण दलित शब्दाचा घटनेत किंवा कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारे उल्लेख करण्यात आलेला नाही. 

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीMumbai High Courtमुंबई हायकोर्टCentral Governmentकेंद्र सरकार