शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

प्रियांका गांधींच्या रूममध्ये कुठून घुसली धूळ; का मारावा लागला झाडू? चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 09:45 IST

"ज्या रूममध्ये प्रियांका गांधी यांना थांबवण्यात आले होते, ती रूम त्या पोहचण्यापूर्वीच स्वच्छ करण्यात आली होती."

लखनौ - काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा, गेस्ट हाऊसमधील झाडू मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून खळबळ उडाली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकार्‍यांनी गेस्ट हाऊसमध्ये प्रियांकांना कुठल्या परिस्थितीत आणि कुणी झाडू उपलब्ध करून दिला, याची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, प्रियांका यांना येथे आणण्यापूर्वीच या एसी रूममध्ये पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली होती. एवढेच नाही, तर व्हीव्हीआयपी प्रोटोकॉल पूर्ण केला असतानाही रूममध्ये धूळ कुठन आली, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. तसेच, प्रियांका यांचा झाडू मारतानाचा व्हिडिओ त्यांच्या PSO ने तयार केल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (Iakhimpur Kheri from where dust came in Priyanka Gandhi's room inquiry begins)

लखीमपूरला जाताना ताब्यात घेण्यात आलेल्या प्रियांका गांधी यांना सीतापूरच्या पीएसी परिसरातील एका अतिथीगृहात नेण्यात आले. येथे त्यांचा झाडू मारतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. पीएसीच्या काही अधिकाऱ्यांनी गेस्ट हाऊसमधील कर्मचाऱ्यांची चौकशीही केली आणि एक अहवालही तयार करण्यात आला आहे.

प्रियांका गांधी यांच्या स्टाफनेचे मागितला होता झाडू - सेकंड कॉर्प्स पीएसीचे जनरल यादवेंद्र सिंह यांनी सांगितले की, प्रियांका गांधी यांच्या स्टाफने झाडू मागितला होता. मॅडमला स्वच्छता करायची आहे, असे त्यांनी म्हटले होते. यावर तेथील कर्मचाऱ्याने त्यांना झाडू दिला. यानंतरच हा व्हिडिओ व्हायरल झाला. आतापर्यंतच्या तपासात एवढेच स्पष्ट होऊ शकले आहे. प्रियांका गांधी पोहोचण्यापूर्वीच स्वच्छ करण्यात आली होती रूम - पीएसी परिसरातील या गेस्ट हाऊसमध्ये एकूण चार रूम आहेत. येथे दोन सफाई कामगार स्वच्छतेसाठी तैनात असतात. हे लोक येथे रोजच्या रोज स्वच्छता करतात. येथे एका फॉलोअरशिवाय स्वच्छता व्यवस्थेचे मॉनिटरिंग करण्यासाठीही दीवान तैनात आहे. या रूम खाली असल्या तरी येथे रोज झाडू-पोचा केला जातो. ज्या रूममध्ये प्रियांका गांधी यांना थांबवण्यात आले होते, ती रूम त्या पोहचण्यापूर्वीच स्वच्छ करण्यात आली होती. तसेच रोजच्या रोज मुख्य गेटपासून ते आतपर्यंत स्वच्छता केली जाते, असेही कमांडरने म्हटले आहे

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश