फेसबुकवर 'इगो ट्रिक'मध्ये अडकला वायुदलाचा अधिकारी, ISI ला देऊन टाकली गोपनीय माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 10:23 AM2018-02-10T10:23:04+5:302018-02-10T10:23:23+5:30

अरुण मारवाह यांना आयएसआयने फेसबुकद्वारे ‘हनी ट्रॅप’मध्ये ओढले होते. आपण मॉडेल्स असल्याचे भासवून आयएआयच्या एजंट्सनी त्यांना भुरळ घातली होती

IAF officer fell for ego trick on Facebook shared confidential information with ISI | फेसबुकवर 'इगो ट्रिक'मध्ये अडकला वायुदलाचा अधिकारी, ISI ला देऊन टाकली गोपनीय माहिती

फेसबुकवर 'इगो ट्रिक'मध्ये अडकला वायुदलाचा अधिकारी, ISI ला देऊन टाकली गोपनीय माहिती

Next

नवी दिल्ली - पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती देणारे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह फेसबुवर 'इगो ट्रिक'च्या जाळ्यात अडकल्याचं समोर आलं आहे. अरुण मारवाह (वय ५१ वर्षे) यांना आयएसआयने फेसबुकद्वारे ‘हनी ट्रॅप’मध्ये ओढले होते. आपण मॉडेल्स असल्याचे भासवून आयएआयच्या एजंट्सनी त्यांना भुरळ घातली होती. फेसबुवर महिला बनून त्यांच्याशी चॅट करणा-या दोन एजंटपैकी एकाने त्यांना इगो ट्रिक वापरत आपल्या जाळ्यात ओढलं आणि गोपनीय माहिती काढून घेतली. 

इंटर स्टेट इंटलिजन्स या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय हवाई दलाविषयीची गोपनीय माहिती पोहोचविल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना अटक केली आहे. हवाई दलाच्या मुख्यालयातून अरुण मारवाह त्यांच्या मोबाइलद्वारे अत्यंत हवाई दलाशी संबंधित अतिमहत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढून ते व्हॉट्सअ‍ॅपवरुन आयएसआयला पाठवित होते. 

'तुम्ही खोटं बोलत नाही आहात यावर मी कसा विश्वास ठेवावा. तुम्ही भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आहात याला पुरावा काय', असा प्रश्न महिमा पटेल या फेसुबक युजरने अरुण मारवाह यांना विचारला. यानंतर आपल्या सत्यतेवर एक तरुण मुलगी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याने अरुण मारवाह यांचा स्वाभिमान दुखावला आणि त्यांच्या याच ट्रिकला ते बळी पडले आणि आपली ओळख पटवून देण्याच्या नादात गोपनीय माहिती देऊन बसले. 

अरुण मारवाह यांच्या गेल्या काही दिवसांतील हालचालींविषयी शंका आल्याने, हवाई दलाच्या गुप्तचर अधिकाºयांनी त्यांना ३१ जानेवारी रोजी ताब्यात घेतले होते. पोलीस सध्या त्यांचे चॅट तपासत आहेत. मात्र मोबाइलमधून हा डाटा त्यांनी डिलीट केला आहे. विशेष पथक फेसबुक आणि व्हॉट्सअॅपकडून माहिती डाटा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जर डाटा मिळाला तर ठोस पुरावा हाती लागेल असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

आर्थिक देवाण-घेवाण नाही?
मात्र, या प्रकरणात कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. केवळ लैंगिंक संबंधांविषयीच्या संदेशांच्या बदल्यात हा अधिकारी युद्धसरावत, तसेच युद्धाशी संबंधित लढाऊ विमानांची माहिती देत होता. या अधिकाºयामुळेच ‘गगन शक्ती’ या हवाई दलाच्या सरावाची माहितीही पाकिस्तानला मिळाली, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल फॉरेन्सिक लॅबकडे
मारवाहला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिल्लीच्या लोधी कॉलनीत त्याची चौकशी सुरू आहे.गुप्तचर कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा मोबाइल ताब्यात घेण्यात आला असून, तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आला आहे. या अधिका-याचे पोस्टिंग हवाई दलाच्या मुख्यालयात होते. तेथून आपणाला ही सारी माहिती मिळाली, अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली, असे कळते.
मारवाह यांना आठवडाभर लैंगिक भावना उत्तेजित करणारे, तसेच अश्लील संदेश मॉडेल्सच्या नावाखाली आयएसआयचे एजंट्स पाठवित होते. त्यानंतर, त्यांनी मारवाह यांच्याकडून हवाई दलाच्या युद्धसरावाची माहिती मागितली आणि त्यांनी ती माहिती फोटोंसह व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठविली, असे उघड झाले आहे.
 

Web Title: IAF officer fell for ego trick on Facebook shared confidential information with ISI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.