शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

आयएएफ अधिकाऱ्याला चिरडले

By admin | Updated: January 14, 2016 02:04 IST

लोखंडी कठडे तोडून आत घुसलेल्या एका भरधाव कारने प्रजासत्ताक दिन परेडच्या रंगीत तालमीत सहभागी झालेल्या एका भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याला चिरडले.

कोलकाता : लोखंडी कठडे तोडून आत घुसलेल्या एका भरधाव कारने प्रजासत्ताक दिन परेडच्या रंगीत तालमीत सहभागी झालेल्या एका भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याला चिरडले. ही घटना बुधवारी सकाळी कोलकाता येथे घडली. राजदचे माजी आमदार मोहम्मद सोहराब यांचा मुलगा ही कार चालवित होता.परेड सुरू असल्याने कोलकाता येथील रेड रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सकाळी ६.३० च्या दरम्यान नवीकोरी पांढरी आॅडी कार रस्त्यावर लावलेले तिन्ही लोखंडी कठडे तोडून परेड सुरू असलेल्या ठिकाणी घुसली. यावेळी परेडची देखरेख करीत असलेले एयर फोर्स ड्रिल प्रशिक्षक कार्पोरल अभिमन्यू गौड (२१) यांना कारने चिरडले. या अपघातात गौड गंभीर जखमी झाले. इतर अधिकाऱ्यांनी त्यांना लगेच ईस्टर्न कमान रुग्णालयात हलविले. पण तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. परेड सुरू असताना हा मार्ग सकाळी कठडे लावून बंद ठेवला जातो. परंतु ही आॅडी कार अतिशय वेगात आली आणि तिन्ही कठडे तोडून परेडमध्ये घुसली. यावेळी गौड यांना चिरडतच कार सुसाट वेगाने पुढे गेली आणि पुढे काही अंतरावर लावलेल्या दुसऱ्या एका कठड्याला धडकल्यानंतर थांबली. यानंतर चालक कार सोडून घटनास्थळावरून पसार झाला.ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे स्पष्ट करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघाताला जबाबदार असलेल्या कार चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. बॅनर्जी यांनी गौड यांच्या नातेवाईकांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. परेड सुरू आहे आणि कठडे लावून रस्ताही बंद करण्यात आला आहे, हे माहीत असतानाही कार चालकाने कार आत घातली. कठोर कारवाई करण्याचे निर्देश आपण पोलीस आयुक्तांना दिले आहेत, असे बॅनर्जी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)अद्याप कोणालाही अटक नाहीया संदर्भात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी कार विकणाऱ्या आॅडीच्या शोरूममध्ये रेकॉर्डची तपासणी केली असता ही कार राजदचे माजी आमदार मोहम्मद सोहराब यांच्या नावावर पंजीकृत केल्याचे आणि सोहराब यांचा पुत्र अम्बिया सोहराब याने ती ९० लाखांत विकत घेतल्याचे समजले. ही कार अम्बियाने ४ जानेवारीलाच ताब्यात घेतली होती. घटनेनंतर पोलिसांनी सोहराब यांच्या घरी धडक दिली. पण त्यांना घराला कुलूप लावलेले दिसले.कार नेमके कोण चालवित होता, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.