शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

IAF Helicopter Crash : CDS जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 16:30 IST

IAF Helicopter Crash : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे १४ अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते. आतापर्यंत ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, जे खूपच जळाले आहेत.

भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. १४ जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे एमआय-१७व्ही५  हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण १४ जण हेलिकॉप्टरमध्ये होते. जनरल बिपिन रावत हे गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात बुधवारी दुपारी १२.२० वाजता लष्कराचे एमआय-१७व्ही५ हेलिकॉप्टर कोसळले. घनदाट जंगलात झालेल्या या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे १४ अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते. आतापर्यंत ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, जे खूपच जळाले आहेत.अपघातानंतर सुमारे तासाभरात जनरल बिपीन रावत यांना वेलिंग्टन येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. जनरल बिपिन रावत गंभीर जखमी झाल्याचा दावा काही अहवालात केला जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जनरल रावत यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी दिल्लीत त्यांच्या घरी पोहोचले. जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. त्यांनी १ जानेवारी २०२० रोजी हे पद स्वीकारले. रावत यांनी ३१ डिसेंबर २०१६  ते ३१ डिसेंबर २०१९ या काळात लष्करप्रमुखपद भूषवले होते.

निवृत्त लेफ्टनंट जनरल एचएस पनाग यांनी श्रद्धांजली वाहिलीजनरल बिपिन रावत यांच्याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही, परंतु लष्कराच्या सूत्रांनी आणि काही माजी अधिकाऱ्यांनी जनरल बिपिन रावत यांच्या निधनाबद्दल ट्विट केले आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल एचएस पनाग यांनी ट्विट करून जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. हे लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. 

1. जनरल बिपिन रावत2. मधुलिका रावत3. ब्रिगेडियर एलएस लिडर4. लेफ्टनंट के. हरजिंदर सिंग5. नायक गुरसेवक सिंग6. नायक. जितेंद्र कुमार7. लान्स नाईक विवेक कुमार8. लान्स नाईक बी. साई तेजा9. हवालदार सतपालसापडलेले मृतदेह ८५% जळाले आहेत. 

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाBipin Rawatबिपीन रावतTamilnaduतामिळनाडूforestजंगलDefenceसंरक्षण विभाग