मुंबई - जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये सुरक्षा यंत्रणांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेल्या संशयास्पद आयएडीनंतर सतर्कता वाढवली आहे. या दोन्ही घटनेनंतर परिसरातील वाहतूक रोखण्यात आली. बॉम्ब निकामी पथकाने स्फोटके निष्क्रिय केली. सर्वात आधी जम्मू काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात शनिवारी संशयास्पद IED स्फोटके सापडल्याने खळबळ माजली. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ परिसर ताब्यात घेत लोकांची आवाजावी थांबवली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहचले त्यांनी सुरक्षितपणे बॉम्ब निष्क्रिय केले. खोऱ्यात कायम दहशतवादी व्हिआयपी, सैन्य, पोलीस आणि सुरक्षा जवानांना टार्गेट करण्यासाठी रस्त्याशेजारी IED स्फोटके ठेवतात. हाच धोका लक्षात घेता सैन्य आणि अर्धसैनिक दलाने नियमितपणे सकाळी गस्त घालत तपासणी करतात. IED स्फोटके जागतिक स्तरावर सैन्यासाठी मोठं आव्हान आहे. ते सामान्य औद्योगिक रसायनांपासून किंवा इलेक्ट्रॉनिक घटकांपासून बनवले जाऊ शकतात. ज्यामुळे ते शोधणे कठीण होते. ते लहान पॅकेटपासून ते मोठ्या वाहनात बसवलेल्या स्फोटकांपर्यंत आकाराचे असू शकतात.
पंजाबमध्ये पोलिस चौकीजवळ बॅगेत IED सापडले
दरम्यान, अमृतसर ग्रामीण पंजाबमधील राया भागात पोलिस चौकीजवळ बॅगेत आयईडी सापडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ परिसर सील केला आणि बॉम्ब निकामी पथकाच्या मदतीने स्फोटक निकामी केले. परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही तर पोलिस संशयितांची ओळख पटवत आहेत. सध्या पुढील तपास करत आहेत अशी माहिती पोलीस अधिकारी सुहेल कासिम मीर यांनी दिली.
Web Summary : Security forces in Jammu Kashmir and Punjab averted major incidents by recovering and defusing IEDs. Authorities initiated investigations, enhancing security measures and traffic restrictions in both regions following the discoveries near a police post and in the Ganderbal district, respectively.
Web Summary : जम्मू कश्मीर और पंजाब में सुरक्षा बलों ने आईईडी बरामद कर बड़े हादसों को टाला। पुलिस चौकी के पास और गांदरबल जिले में हुई खोजों के बाद अधिकारियों ने जांच शुरू की, सुरक्षा उपायों को बढ़ाया और दोनों क्षेत्रों में यातायात प्रतिबंध लगाए।