मला कितीही त्रास दिला तरी मी भारत सोडून जाणार नाही - रॉबर्ट वाड्रा

By Admin | Updated: April 14, 2016 19:53 IST2016-04-14T19:53:51+5:302016-04-14T19:53:51+5:30

माझ्याबद्दल कोणीही काय बोललं, मला कितीही त्रास दिला तरी मी भारत सोडून जाणार नाही. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मी प्रियंकावर विसंबून नाही

I would not leave India if I had any troubles - Robert Vadra | मला कितीही त्रास दिला तरी मी भारत सोडून जाणार नाही - रॉबर्ट वाड्रा

मला कितीही त्रास दिला तरी मी भारत सोडून जाणार नाही - रॉबर्ट वाड्रा

>ऑनलान लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - माझ्याबद्दल कोणीही काय बोललं, मला कितीही त्रास दिला तरी मी भारत सोडून जाणार नाही. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मी प्रियंकावर विसंबून नाही असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा म्हणाले. ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यांनी पत्नी, राजकारण आणि संपत्ती या तीन विषयांवर भाष्य केलं. 
 
आपण सधन कुटूंबातील असून आई-वडिलांनी दिलेला पुरेसा पैसा आणि संपत्ती आपल्याकडे आहे. त्यामुळे मी प्रियंकावर विसंबून नसल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजकापासून कॉमन माणसापर्यत सर्वच जण सध्या त्रस्त आहेत. लोक आता गप्प बसणार नाहीत. खऱ्या-खोटयाचा सोक्षमोक्ष लागेल आणि लोक त्याविरोधात आवाज उठवतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. युवा वर्गावर विचार लादण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
 

Web Title: I would not leave India if I had any troubles - Robert Vadra