"मी त्याला एकट्याला जाऊ देणार नाही"...मुलाची कॅनडात हत्या, आईनं स्वत:ला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 11:17 IST2023-07-30T11:04:04+5:302023-07-30T11:17:09+5:30

गुरविंदरची आई शेजारील महिलांना सांगायची जर माझ्या मुलाला काही झाले तर मी एकटं राहू शकत नाही.

"I won't let him go alone"...Child murdered in Canada, mother commits suicide | "मी त्याला एकट्याला जाऊ देणार नाही"...मुलाची कॅनडात हत्या, आईनं स्वत:ला संपवलं

"मी त्याला एकट्याला जाऊ देणार नाही"...मुलाची कॅनडात हत्या, आईनं स्वत:ला संपवलं

अमृतसर - मी त्याला एकट्याला जाऊ देणार नाही असं टाहो करत २४ वर्षीय युवकाच्या आईनं केल आहे. अलीकडेच कॅनडातील हल्ल्यात तिच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. मुलाचा मृतदेह डोळ्यादेखत पाहायला नको, म्हणून आईनं मृतदेह येण्यापूर्वीच आत्महत्या करत स्वत:चे आयुष्य संपवले. एकीकडे मुलाचा मृतदेह अन् दुसरीकडे आईचा. या दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पंजाबच्या शहीद भगत सिंह नगर परिसरातील ही दुर्दैवी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरविंदर नाथ नावाचा युवक २ वर्षापूर्वी कॅनडात शिक्षणासाठी गेला होता. टोरंटोच्या लॉयलिस्ट कॉलेजमध्ये तो बिझनेस शिक्षण घेत होता. त्याचसोबत खर्च पूर्ण करण्यासाठी युवक पार्टटाईम जॉब म्हणून पिज्जा डिलिवरी करत होता. ९ जुलैच्या रात्री मिसिसॉगा शहरात डिलिवरीवेळी त्याच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्याची कारही पळवून नेली. गुरविंदरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. गुरविंदरच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध होताच त्याच्या मोठा भावाने ही घरच्यांपासून लपवले. इंटरनेट सेवाही बंद केली जेणेकरून त्यांना गुरविंदरला कॉल करता येणार नाही.

आइमा गावात दूध डेअरी चालवणारे गुरविंदरचे वडील कृष्णा देव यांनी सांगितले की, माझ्या पत्नीच्या आत्महत्येनंतर गुरविंदरच्या मृत्यूची बातमी समजली. माझ्या आयुष्यातील सर्वकाही हिरावलं आहे. काही दिवसांपासून मी गुरविंदरशी बोलण्यासाठी त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु इंटरनेट नसल्याने संपर्क झाला नाही. गुरविंदरची आई शेजारील महिलांना सांगायची जर माझ्या मुलाला काही झाले तर मी एकटं राहू शकत नाही.

गुरविंदरची आई नरिंदर देवी धुतलेले कपडे सुकवत होती. तेव्हा गुरविंदरचा मृतदेह येणार असल्याचे कुणीतरी बोलले. तिला हा भास झाल्याचं वाटलं. मी नेहमी माझ्या मुलाला कधी एकटं राहू दिले नाही. परंतु गुरुवारी घरातून बाहेर जात तिने विष घेतले आणि जीव दिला. गुरविंदरवर याआधीही हल्ला झाला होता असं त्याचे वडील कृष्ण देव यांनी म्हटलं.

Web Title: "I won't let him go alone"...Child murdered in Canada, mother commits suicide