शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

"लवकरच करणार राजकारणात पदार्पण’’, रॉबर्ट वाड्रा यांचं सूचक विधान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 14:45 IST

Robert Vadra News: नुकत्यात झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळळून प्रियंका गांधी यांनी संसदीय राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर आता प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही सक्रीय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे.

नुकत्यात झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळळून प्रियंका गांधी यांनी संसदीय राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर आता प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही सक्रीय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. एक जुना व्हिडीओ शेअर करून वाड्रा यांनी तसे संकेत दिले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला रॉबर्ट वाड्रा यांनी मीसुद्धा लवकरच जॉईन करेन, अशी कॅप्शन दिली आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशाची चर्चा याआधीही रंगली होती. तसेच त्यांनी अमेठी येथून निवडणूक लढवण्यासाठी दावा ठोकला होता. मात्र तेव्हा काँग्रेसने रॉबर्ट वाड्रा यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे सक्रिय राजकारणात उतरण्यासाठी इच्छूक असलेल्या रॉबर्ट वाड्रा यांचा नवा दावा कितपत खरा ठरेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्रियंका गांधी यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली तेव्हाही रॉबर्ट वाड्रा यांनी सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. ते म्हणाले होते की, प्रियंका गांधी खासदार बनल्याने माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. मीसुद्धा सक्रिय राजकारणात येण्यास सज्ज आहे. काँग्रेसला जेव्हा वाटेल तेव्हा मी सक्रिय राजकारणात येईन. भाजपा ज्या गोष्टींबाबत लपवाछवपी करतेय, त्या प्रियंका गांधी संसदेत उपस्थित करतील. यंत्रणांचा दुरुपयोग आणि महिलांसाठीचे प्रश्न प्रियंका गांधी मांडतील.

दरम्यान, काँग्रेस पक्षावर असलेली नेहरू-गांधी कुटुंबीयांची पकड आणि एकाच कुटुंबातील अनेक सदस्य संसदेत असल्यावरून भाजपा काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करत असतो. त्यात आता रॉबर्ट वाड्रा हे सक्रिय राजकारणात उतरले तर भाजपाच्या हाती आयतं कोलीत मिळेल. तर दुसरीकडे राहुल गांधी नव्हे तर प्रियंका गांधी ह्या काँग्रेसच्या उत्तराधिकारी असतील, असा दावा अनेक राजकीय जाणकारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेसच्या राजकारणात रॉबर्ट वाड्रा यांचं महत्त्व वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसFamilyपरिवार