शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा', मोदींच्या असिस्टंटनेच माफी मागावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 13:22 IST

राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेत्यांनी संसदेत केली होती.

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना मी चूक केली नाही, मी माफी मागणार नाही असे म्हटले. आपल्या आक्रमक भाषणात बोलताना, राहुल यांनी मोदी आणि अमित शहांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. नोटाबंदी, देशातील महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यांवरुन राहुल यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, मै मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा, असे राहुल यांनी भाजपा नेत्यांना प्रत्युत्तर दिलं. 

राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेत्यांनी संसदेत केली होती. मात्र, मी कदापी माफी मागणार नसल्याचे राहुल यांनी स्पष्ट केलंय. माझं नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे, त्यामुळे मी माफी मागणार नसल्याचं राहुल यांनी म्हटले. तसेच, माफी मागायची असेल तर मोदींचे असिस्टंट असलेल्या अमित शहांनी माफी मागावी, असेही राहुल यांनी म्हटले. दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसकडून मोदी सरकारच्या विरोधात भव्य रॅली काढण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक, महिलांवरील अत्याचार, आर्थिक मंदी आणि अन्य मुद्द्यावरुन काँग्रेस या रॅलीच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधणार आहे. रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. देशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते  या रॅलीत सहभागी झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहनसिंग आणि प्रियंका गांधी यांच्यासह अन्य दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. 

काँग्रेस नेत्या सरचिटणीस प्रियंका गांधी, मनमोहनसिंग यांच्या भाषणानंतर राहुल गांधींनी भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी, मोदी सरकार हे अदानी आणि अंबानींसाठी काम करत असल्याचा आरोप राहुल यांनी केली. देशाची अर्थव्यवस्था मोदींनी नष्ट केली असून जे काम शत्रुंनी केलं नाही ते मोदींनी केलं आहे, असेही राहुल गांधींनी म्हटले. गेल्या 45 वर्षात सर्वात मोठी बेरोजगारी मोदी सरकारच्या काळात आली आहे, असे म्हणत मोदी आणि अमित शहांवर हल्लाबोल केला. रेप इन इंडिया या वक्तव्यावरुन भाजपा नेत्या आणि मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना माफी मागण्याचे आवाहन केले होते. मात्र, मोदींच्या भाषणाचा संदर्भ देत मी कधीही माफी मागणार नसल्याचे राहुल यांनी म्हटले. मै मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा, असे राहुल यांनी म्हटले.  

दरम्यान, रामलीला मैदानात काँग्रेसच्या या रॅलीसाठी भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते या भव्य रॅलीला उपस्थित आहेत. तसेच देशाच्या प्रत्येक राज्यातून काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीत सहभागी आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविधेयक आणि महिलांवरील अत्याचार असे अनेक मुद्दे घेऊन काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलंय.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंग