शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारताला 'प्रेमपत्र' लिहिणे सुरुच ठेवणार, 'टू इंडिया' वादावर वीर दासचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 12:03 IST

वॉशिंग्टनमधील केनेडी सेंटरमध्ये सादर केलेल्या कवितेवरुन वीर दासवर टीकेची झोड उठत आहे.

नवी दिल्ली: वॉशिंग्टनमधील केनेडी सेंटरमध्ये नुकत्याच झालेल्या 'टू इंडिया' या कवितेवरुन तीव्र टीकेचा सामना करणारा स्टँड-अप कॉमेडियन वीर दासने स्पष्टीकरण दिलं आहे. 'विनोद करणे हे माझे काम आहे आणि जोपर्यंत विनोद करण्यास सक्षम असेल, तोपर्यंत भारताला 'प्रेमपत्र' लिहीत राहीन', असे मत वीर दासने व्यक्त केले आहे. 

वीर दासने मागच्या आठवड्यात यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्याने भारताच्या दोन बाजू मांडल्या. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर भारताचा अपमान केल्याचा ठपका ठेवला आणि त्याच्या या कवितेचा जोरदार विरोध केला. या वादानंतर पहिल्यांदाच वीर दासने समोर येऊन आपले मत मांडले. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'मी माझे काम करण्यासाठी येथे आलो आहे आणि पुढेही काम सुरुट ठेवेल. माझे काम लोकांना हसवणे आहे आणि जर तुम्हाला ते विनोदी वाटत नसेल तर हसू नका. ती कविता म्हणजे व्यंग होते आणि माझा विश्वास आहे की, सेंस ऑफ ह्यूमर असलेल्या कोणत्याही भारतीयाला या कवितेमागची विनोदाची भावना समजेल.'

तो पुढे म्हणतो की, 'मला वाटत की, विनोद एखाद्या सणासारखा असतो. जेव्हा एका खोलीत बसलेले शेकडो लोक हसतात आणि टाळ्यांचा आवाज येतो तेव्हा तो गर्वाचा क्षण असतो. मला वाटतं की, ज्याला विनोद कळतो आणि ज्याने माझा तो संपूर्ण व्हिडिओ पाहिला आहे, त्याला त्यामागची भावना समजेल. एक कलाकार म्हणून मला अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात, लाखो लोकांनी माझे कौतुक केले आहे. मी टीकेकडे गांभीर्याने पाहत नाही, माझ्यासाठी कौतुक महत्वाचं आहे.'

व्हिडिओमध्ये काय आहे ?अमेरिकेतील केनेडी सेंटरमध्ये अभिनेता-कॉमेडियन वीर दासने एक कविता सादर केली होती. त्यात त्याने भारताच्या दोन बाजू दाखवल्या. यामध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कारापासून शेतकऱ्यांचे आंदोलन आणि प्रदूषणासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. यात काही वादग्रस्त विषयांचाही उल्लेख आहे. त्याच्या या व्हिडिओनंतर काहीजण त्याच्यावर टीका करत आहेत, तर काहीजण त्याचे कौतुक करत आहेत.  

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिका