शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मी पुन्हा मुख्यमंत्री होणार- सिद्धरामय्यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 12:35 IST

लोक मला आशीर्वाद देतील आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने माझा पराभव झाला. पण हा शेवट नाही.

बंगळुरु- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्रीसिद्धरामय्या आणि सध्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यामध्ये सारंकाही आलबेल नाही हे आतापर्यंत अनेकदा समोर आलं आहे. अर्थसंकल्प असो वा राज्यातील प्रकल्प प्रत्येक बाबतीत सिद्धरामय्या यांनी जनता दल सेक्युलरपेक्षा वेगळं मत मांडलं आहे. कर्नाटकातील सरकार किती वर्षे चालेल याबाबत आधीपासून शंका व्यक्त होत असल्या तरी आता सिद्धरामय्या यांनी आपण मुख्यमंत्री होणार असा थेट विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा नव्या घडामोडी होणार का याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.हसनमध्ये एका सभेत बोलताना सिद्धरामय्या यांनी आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असे सांगितले. राजकारणात जय-पराजय होत असतोच. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने मी परत एकदा मुख्यमंत्री होणार. मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून विरोधी पक्षांनी एकत्र प्रयत्न केले. राजकारणामध्ये जाती आणि धनशक्तीचे प्राबल्य वाढत आहे.सिद्धरामय्या पुढे म्हणाले,'  लोक मला आशीर्वाद देतील आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने माझा पराभव झाला. पण हा शेवट नाही. राजकारणात जय-पराजय या सामान्य बाबी आहेत.'याच महिन्यात फिल्म सिटीचा प्रकल्प रामनगर येथे स्थापन केला जाऊ नये असे सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामींना पत्र लिहिले होते. सिद्धरामय्या यांनी गेल्या दोन महिन्यात मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हे पाचवे पत्र आहे. सिद्धरामय्या गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीही होते. गेल्या सरकारचे शेवटचे बजेट सादर करताना त्यांनी म्हैसुर येथे फिल्मसिटी स्थापन  करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र सध्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी हा निर्णय बदलून फिल्म सिटी रामनगर येथे नेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दलच सिद्धरामय्या यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. कुमारस्वामींनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली होती.

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणPoliticsराजकारणChief Ministerमुख्यमंत्री