मी अमेरिकेत स्थायिक होणार, ही निव्वळ अफवा - प्रीति झिंटा

By Admin | Updated: June 19, 2014 10:41 IST2014-06-19T09:55:14+5:302014-06-19T10:41:43+5:30

अभिनेत्री प्रीति झिंटाने आपण किंग्ज इलेव्हन पंजाबची भागीदारी विकून अमेरिकेत स्थायिक होण्याची बातमी ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

I will be settled in America, this is a pure rumor - Preity Zinta | मी अमेरिकेत स्थायिक होणार, ही निव्वळ अफवा - प्रीति झिंटा

मी अमेरिकेत स्थायिक होणार, ही निव्वळ अफवा - प्रीति झिंटा

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १९ - अभिनेत्री प्रीति झिंटाने आपण किंग्ज इलेव्हन पंजाबची भागीदारी विकून अमेरिकेत स्थायिक होण्याची बातमी ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. बुधवारी ट्विटरवरून प्रीतीने हे स्पष्टीकरण दिले आहे.
या ट्विटमध्ये प्रीतीने सर्वांचे त्यांनी दिलेल्या सहकार्यासाठी आभार मानले आहेत. तसेच आपण किंग्ज इलेव्हन पंजाबची भागीदारी विकत नसल्याचे किंवा अमेरिकला स्थायिक होत नसल्याचेही म्हटले आहे. तथाकथित सूत्र काहीही बोलत असतात आणि त्याची बातमी बनते. कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका, असेही तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान प्रीति झिंटा व नेस वाडिया प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. प्रीती झिंटाला त्रास देऊ नका. तिला त्रास दिल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी नस्ली वाडियांना देण्यात आली आहे. याप्रकरणी वाडिया समुहाच्या अधिका-यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. 
प्रीती झिंटाने नेस वाडियांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस तपास करत असून नेस वाडियांवर अटकेची तलवार लटकत आहे. 

 

Web Title: I will be settled in America, this is a pure rumor - Preity Zinta