३१ वर्षाचा तरुण... दहा वर्षात १००० तरुणींसोबत प्रेमसंबंध. पण आता तरुणाला पश्चाताप होतोय. यामुळेच या तरुणाची लव्ह लाईफ चर्चेत आली आहे. कारण १००० तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये राहिलेला हा तरुण इतरांना असं करू नका, सांगत आहे. असं काय घडलंय त्याच्या आयुष्यात?
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डेली स्टारने या तरुणाबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. हा तरुण दक्षिण लंडनमधील क्रायडनमध्ये राहतो. बेनी जेम्सी असे या ३१ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो गेल्या १० वर्षात १००० पेक्षा जास्त महिलांच्या रिलेशनशिपमध्ये राहिला. एका आठवड्यात एका महिलेसोबत तो राहिला. तिच्यासोबत संबंध ठेवले. पण, आता त्याला याचा पश्चाताप होतोय.
बेनी म्हणाला, 'मी असं का करत राहिलो याचा मला आता पश्चाताप होतो. कारण असं केल्याने तुम्ही हळूहळू वाईट सवयींच्या गर्तेत ढकलले जाता. नंतर सर्वसामान्य व्यक्तीसारखं आयुष्य जगणं अवघड होऊन जाते आणि तुम्हाला एकटपेणा वाटू लागतो.'
बेनी जेम्सचे १००० महिलांसोबत शरीरसंबंध
बेनीने सांगितले की, '१००० पेक्षा अधिक महिलासोबत माझे शरीरसंबंध होते. त्यामुळेच मी बोनी ब्लू हिला सावध केले आहे की, तू खूप मोठी चूक करत आहेस.'
बोनी ब्लू एक मॉडेल आहे आणि तिने १००० लोकांसोबत संबंध ठेवण्याचा रेकॉर्ड करण्याचे जाहीर केले आहे.
आता पश्चाताप होतोय
पैसे कमावण्याचे वेड त्या गोष्टीची भरपाई करू शकत नाही, जे भविष्यात तुमची वाट बघत असतात. बेनी जेम्स हा एक कॉन्टेट क्रिएटर आहे. त्याने १० वर्षाच्या काळात अनेक महिला-तरुणीसोबत शय्यासोबत केली. ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याचा या महिलांशी संपर्क झाला आणि त्यांच्यात शरीरसंबंध झाले. बेनी प्रत्येक आठवड्यात चार वेगवेगळ्या क्लबमध्ये जायचा आणि तिथे वेगवेगळ्या महिला-तरुणींना भेटायचा.
बेनीला ही सवय का लागली?
कॉन्टेट क्रिएटर असलेल्या बेनी जेम्सला ही सवय का लागली? असा प्रश्न जेव्हा आला. त्यावर तो म्हणाला, सुरूवातीला हे मौजमस्तीतील आयुष्य म्हणून मी फार याचा गांभीर्याने विचार केला नाही. पण, आता मागे वळून बघितलं तर वाटतं की त्याला या गोष्टींची सवय एकटेपणातून लागली. तो तणावात असायचा आणि अडचणींना सामोरा जात होता. अनेकदा तर काही दिवस घरातून बाहेरही पडायचा नाही. त्यातून त्याला मद्य आणि इतर मादक पदार्थ सेवनाची सवयही लागली होती.
आता बेनी एका तरुणीसोबत राहत आहे. त्याचं आयुष्य आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्याने दारू पिणंही बंद केलं आहे. लॉकडाऊनच्या काळात तो एकटा राहिला. त्यानंतर त्याने त्याचे आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्याची सुरुवात केली.