शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
3
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
4
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
8
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
9
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
10
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
11
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
12
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
13
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
14
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
15
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
16
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
17
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
18
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
19
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
20
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला

तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:09 IST

Uttar Pradesh News: हल्लीच प्रदर्शित होऊन ५० वर्षे झालेल्या शोले या चित्रपटामध्ये वीरूचं पात्र साकारणाऱ्या धर्मेंद्रनं बसंती या प्रेयसीला मिळवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या नाटकाचा सीन खूप गाजला होता. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यात घडली आहे.

हल्लीच प्रदर्शित होऊन ५० वर्षे झालेल्या शोले या चित्रपटामध्ये वीरूचं पात्र साकारणाऱ्या धर्मेंद्रनं बसंती या प्रेयसीला मिळवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या नाटकाचा सीन खूप गाजला होता. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यात घडली आहे. येथे पवन पांडे नावाचा तरुण प्रेयसीसाठी मोबाईलच्या टॉवरवच चढून धिंगाणा घालू लागला. खुशबू नावाच्या आपल्या प्रेयसीला इथे बोलावलं नाही तर टॉवरवरून उडी मारून जीव देईन अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मात्र सर्व नाट्य आटोपून जेव्हा प्रेयसीचं सत्य समोर आलं तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली.

याबाबत सर्कल ऑफिसर अशोक कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार पवन पांडे नावाचा हा प्रियकर शहरात एक पानाचं दुकान चालवतो. रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तो याकूबपूर येथील एका मोबाईलच्या टॉवरवर चढला. तिथून तो खुशबू नावाच्या त्याच्या प्रेयसीला हाका मारू लागला. ती जोपर्यंत समोज येत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही, अशी धमकी तो तिथे जमलेल्या लोकांना देऊ लागला. एवढंच नाही तर ती आली नाही तर टॉवरवरून खाली उडी मारण्याची धमकीही त्याने दिली.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांनी मोबाईलवरून त्याच्याशी संपर्क साधत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.  मात्र तो खुशबूला समोर आणण्याच्या मागणीवर ठाम होता. मात्र पोलिसांनी जेव्हा खुशबू नावाच्या महिलेचा शोध सुरू केला तेव्हा त्या परिसरात त्या नावाची कुठलीही महिलाच अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या तरुणाला खाली उतरण्यासाठी पोलिसांना नवी क्लुप्ती लढवावी लागली.

त्यानंतर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला खुशबू बनून पवनसोबत फोनवर बोलण्यास सांगण्यात आले. पोलिसांची ही योजना यशस्वी ठरली. त्यानंतर सुमारे पाच तास रंगलेल्या नाट्यानंतर पवन नावाचा हा प्रियकर मोबाईल टॉवरवरून खाली उतरला.  तो खाली उतरल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमधून पवन हा मागच्या दोन वर्षांपासून खुशबू नावाच्या एका तरुणीसोबत चॅट करत होता. तसेच त्या प्रोफाईलवर एका महिलेचा फोटो लावलेला होता, अशी  धक्कादायक बाब समोर आली.

या अकाउंटवरून महिला बनून पवनसोबत बोलणाऱ्या व्यक्तीने प्रेमाचं आमिष दाखवून त्याच्याकडून पैसेही उकळले होते. मात्र खुशबू ही आपली खरी प्रेयसी असून, लोक आपल्याला तिच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्याला नेहमी वाटायचे. त्यामुळेच तो लग्नाचा हट्ट धरून मोबाईळ टॉवरवर चढला होता. मात्र अखेरीस हे संपूर्ण प्रकरण ऑनलाइन फसवणुकीचे असल्याचे समोर आले.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी