शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:34 IST

Chhattisgarh Crime News: मी तुमचं स्वप्न पाहिलंय... कॉल करा ना..., असे वेगवेगळे मेसेज असलेलं छत्तीसगडमधील एक महिला डीएसपी आणि एका कोट्यधीश उद्योगपतीचं व्हॉट्सअॅप चॅट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिला डीएसपी कल्पना वर्मा आणि उद्योगपती दीपक टंडन यांच्यातील हे चॅट आणि त्यांचं प्रेमप्रकरण आणि लव्ह ट्रॅप सध्या चर्चेचा विषय ठरलेले आहेत.

मी तुमचं स्वप्न पाहिलंय... कॉल करा ना..., असे वेगवेगळे मेसेज असलेलं छत्तीसगडमधील एक महिला डीएसपी आणि एका कोट्यधीश उद्योगपतीचं व्हॉट्सअॅप चॅट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिला डीएसपी कल्पना वर्मा आणि उद्योगपती दीपक टंडन यांच्यातील हे चॅट आणि त्यांचं प्रेमप्रकरण आणि लव्ह ट्रॅप सध्या चर्चेचा विषय ठरलेले आहेत. तसेच या दोघांचेही फोटो, व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट, व्हिडीओ आणि कागदपत्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. यातील उद्योगपती स्वत:ची फसवणूक झाल्याचं वाटून पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देत आहे. मात्र या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही.  यादरम्यान, उद्योगपती दीपक  टंडन यांनी स्वत: काही व्हॉट्सअॅप चॅट लीक केले असून, त्यात पैशांची मागणी आणि पत्नीला घटस्फोट देण्याबाबतच्या संभाषणाचा समावेश आहे.

पोलीस अधिकारी कल्पना वर्मा आणि दीपक टंडन यांच्यातील हे प्रकरण आता प्रेमप्रकरणापासून पुढे जाऊन लव्ह, सेक्स, फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात परिवर्तीत झालं आहे. तसेच डीएसपी कल्पना वर्मा हिने प्रेमसंबंधांचा गैरफायदा घेऊन दोन कोटी रुपये आणि मौल्यमान सामान उकळल्याचा आरोप दीपक टंडन यांनी केला आहे. कल्पना वर्मा हिने आपल्याकडून दोन कोटी रोख रकमेसोबतच हीऱ्याची अंगठी, सोन्याची चेन आणि एक महागडी गाडी घेतल्याचा आरोप दीपक टंडन यांनी केला आहे. एवढंच नाही तर कल्पना वर्मा हिने माझ्या एका हॉटेलची नोंदणी तिच्या भावाच्या नावावर करून घेतली, असा आरोपही टंडन यांनी केला आहे.

दरम्यान, या व्हॉट्सअॅप चॅटमुळे माझी पत्नी त्रस्त झाली. तसेच डीएसपीसोबतच्या माझ्या संबंधांबाबत आणि व्यवहारांबाबत समजले तेव्हा घरात कलह सुरू झाला, असा दावा टंडन यांनी केला. दरम्यान, वाद वाढल्यानंतर या प्रकरणातील महिला  डीएसपीने व्यावसायिक टंडन यांच्यापासून लांब राहण्यास सुरुवात केली. तर दीपक टंडन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. तसेच या तक्रारीमध्ये व्हॉट्अॅप चॅटचे स्क्रीनशॉट आणि संभाषण आणि आर्थिक देवाणघेवाणीचे  पुरावे सादर केले. या पुराव्यांमधून सदर व्यावसायिक आणि डीएसपीमधील संभाषण आणि पैशांची मागणी झाल्याचे दिसून येत आहे. एवढंच नाही तर डीएसपी कल्पना वर्मा हिने पत्नीला घटस्फोट देण्यासाठी आणि आपल्यासोबत लग्न करण्यासाठी दबाव आणल्याचा दावाही केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Woman DSP's honey trap: Millionaire loses fortune in love affair.

Web Summary : A Chhattisgarh DSP's alleged affair with a millionaire businessman has turned sour. He accuses her of extorting crores and demanding he divorce his wife. WhatsApp chats reveal money requests, leading to police complaints and a scandal involving love, deceit, and corruption.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिपChhattisgarhछत्तीसगड