शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

'मी इंजिनिअरिंग सोडून आर्किटेक्ट बनलो, पण...'; रतन टाटांच्या मनावर आजही मोठे ओझे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:18 PM

फ्यूचर आँफ डिझाईन अँण्ड कन्स्ट्रक्शन या विषयावर सोमवारी पार पडलेल्या एका वेबिनारमध्ये रतन टाटा यांनी संबोधित केले.

मुंबई : देशाची अग्रगण्य कंपनी टाटा ग्रुपचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी कोरोनाच्या संकटकाळात देशाला टाटा ट्रस्टकडून तब्बल दीड हजार कोटी रुपयांची मदत आणि टाटाचे ताज हॉटेल खुले करून दिले. रतन टाटा हे देशाच्या सर्वात मोठ्या उद्योग घराण्याचे सर्वाधिक काळासाठी प्रमुख राहिले आहेत. मात्र, त्यांना उतारवयात काही गोष्टींचे शल्य बोचत आहे. एवढ्या मोठ्या यशस्वी उद्योगपतीला त्यांनी करिअर न घडविल्याचे शल्य बोचत राहणे म्हणजे विशेष आहे. 

फ्यूचर आँफ डिझाईन अँण्ड कन्स्ट्रक्शन या विषयावर सोमवारी पार पडलेल्या एका वेबिनारमध्ये रतन टाटा यांनी संबोधित केले.  एकमेकांना खेटून असलेल्या झोपड्यांमध्ये लोकांना वास्तव्यासाठी ना पुरेशी जागा आहे, ना शुद्ध हवा. विकासक पुनर्विकासाच्या नावाखाली तिथे आलिशान इमारती उभ्या करतात आणि झोपडपट्टीवासीयांना दूरवर गगनचुंबी झोपड्यांमध्ये फेकतात. तिथेही त्यांना किमान पायाभूत मिळत नाहीत. कच-यासारखे एकत्र ठेवून जगणे अवघड झालेल्या लोकांना समाज संबोधले जाते. ही लाजिरवाणी बाब असल्याचे परखड मत टाटा यांनी व्यक्त केले.    

यावेळी त्यांनी त्यांच्या मनावरील एक कायमचे राहिलेले ओझे सांगितले. मला लहानपणापासून आर्किटेक्ट व्हायचे होते. कारण हे क्षेत्र मानवतेच्या भावनांना खोलवर जोडलेले आहे. या क्षेत्रापासून मला प्रेरणा मिळते. मात्र, माझे वडील मला इंजिनिअर बनवू इच्छित होते. यामुळे मी वडिलांच्या इच्छेखातर इंजिनिअरिंगला गेलो. दोन वर्षे शिक्षण घेतल्यावर माझ्या लक्षात आले की मला आर्किटेक्टच व्हायचे आहे, असे टाटांनी सांगितले. 

'' मी इंजिनिअरिंग अर्धवट सोडून आर्किटेक झालो. मात्र, संपूर्ण आयुष्य मी आर्किटेक्चर पासून लांबच राहिलो. मला आर्किटेक्ट न बनल्याचे दु:ख नाहीय, पण शल्य या गोष्टीचे आहे की मी हे काम पुढे सुरु ठेवू शकलो नाही.'', असे रतन टाटा यांनी सांगितले. रतन टाटा यांनी कॉरनेल आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून १९५९ मध्ये आर्किटेक्चरची पदवी घेतली होती. भारतात परतण्यापूर्वी ते लॉस अँजेलिसच्या एका आर्किटेक्ट कार्यालयामध्ये कामही करत होते. 1962 मध्ये त्यांनी टाटा समुहाचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली होती.

आणखी वाचा...

कच्च्या तेलाची किंमत १ डॉलरपेक्षा खाली गेली खरी; पण भारताला फायदा काय?

'उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल'; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या

योगी आदित्यनाथांच्या मावशीला सीमेवर रोखले; जिल्हाधिकाऱ्यांचा पासही होता

किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाbusinessव्यवसाय