"गरिबांना कोरोना लस कधी मिळणार, ती मोफत असणार की नाही?", अखिलेश यादवांचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 06:21 PM2021-01-04T18:21:29+5:302021-01-04T18:24:23+5:30

Akhilesh Yadav And Corona Vaccine : समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कोरोनाच्या लसीबाबत विधान केलं आहे.

I or the Samajwadi party never questioned the experts says Akhilesh Yadav | "गरिबांना कोरोना लस कधी मिळणार, ती मोफत असणार की नाही?", अखिलेश यादवांचा भाजपाला सवाल

"गरिबांना कोरोना लस कधी मिळणार, ती मोफत असणार की नाही?", अखिलेश यादवांचा भाजपाला सवाल

Next

नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनावरील लस आणि लसीकरणाबाबत सकारात्मक बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. मात्र कोरोनाच्या लसीकरणावरून आता राजकारणालाही सुरुवात झाली आहे. याचदरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कोरोनाच्या लसीबाबत अजब आणि धक्कादायक विधान केलं आहे. माझा भाजपावर विश्वास नाही. त्यामुळे मी भाजपाच्या सरकारकडून देण्यात येणारी कोरोनावरील लस घेणार नाही, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी कोरोना लसीबाबत भाष्य केलं आहे. 

कोरोनावरील लस कधी येणार, मोफत असणार की नाही? असा सवाल विचारला आहे. "मी किंवा समाजवादी पक्षाने कधीही तज्ज्ञ, संशोधक किंवा शास्त्रज्ञांविषयी प्रश्न उपस्थित केला नाही. जर संशय किंवा काही शंका असतील तर स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी सरकारची आहे" असं अखिलेश यांनी म्हटलं आहे. तसेच आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की गरिबांना लस कधी मिळेल? मी भाजपाला विचारू इच्छितो की गरिबांना लस देण्यास त्यांना किती वेळ लागेल आणि ती विनामूल्य असेल की नाही?" असा सवाल देखील अखिलेश यादव यांनी विचारला आहे. 

भाजपाला टोला लगावताना समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले अखिलेश यादव म्हणाले की, जे सरकार टाळ्या आणि थाळ्या वाजवत होते तेच सरकार आता लसीकरणासाठी मोठी साखळी का तयार करत आहे. टाळ्या आणि थाळ्या वाजवूनच कोरोनाला का पळवून लावत नाहीत. मी सध्यातरी कोरोनावरील लस घेणार नाही. माझा भाजपाच्या लसीवर विश्वास नाही. जेव्हा आमचे सरकार बनेल तेव्हा सर्वांना मोफत लस देऊ, आम्ही भाजपाची लस घेऊ शकणार नाही.

अयोध्येतील आलेले साधू संत, मौलाना आणि शीख समुदायाच्या लोकांना अखिलेश यादव यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, गंगा-जमुनी तहजीब एका दिवसात विकसित झालेली नाही. ती विकसित व्हायला हजारो वर्षे लागली आहेत. मी धार्मिक माणूस आहे. माझ्या घरात मंदिर आहे. माझ्या घराबाहेरही मंदिर आहे. भगवान राम सर्वांचे आहेत. संपूर्ण जगाचे आहेत. यावेळी अखिलेश यादव यांनी भाजपावर खोटी आश्वासने दिल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत देशाने खूप कठीण दिवस पाहिले आहेत. एवढे वाईट आणि काळे दिवस आम्ही पाहिले नव्हते. उत्तर प्रदेश सरकारने एवढी खोटी आश्वासने दिली आहेत की, आपण कल्पनाच करू शकणार नाही.

Web Title: I or the Samajwadi party never questioned the experts says Akhilesh Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.