आय-लीगचे आयएसएलमध्ये विलीनीकरण आवश्यक!
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:36+5:302015-08-26T23:32:36+5:30
माजी भारतीय फुटबॉलपटू प्रसून बॅनर्जीचे मत

आय-लीगचे आयएसएलमध्ये विलीनीकरण आवश्यक!
म जी भारतीय फुटबॉलपटू प्रसून बॅनर्जीचे मत मडगाव : भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी आय-लीग फुटबॉल स्पर्धेचे आयएसएल (इंडियन सुपर लीग) स्पर्धेत विलिनीकरण होणे आवश्यक आहे. तसेच युवा खेळाडूंना राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अधिक प्रमाणात सामावून घेणे, हे अत्यंत गरजेचे असल्याचे मत भारताचे माजी खेळाडू प्रसून बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. लोकसभेचे खासदार असलेले बॅनर्जी माहिती व तंत्रज्ञानाच्या बैठकीच्या निमित्ताने गोव्यात आले होते. त्यांनी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आकस्मिक भेट दिली. तेव्हा त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. अर्जुन पुरस्कार प्राप्त बॅनर्जी म्हणाले की, भारतीय फुटबॉलचा दर्जा वाढत आहे. तसेच तो उंचावण्यासाठी नव्या-नव्या प्रयोगांची गरज आहे. आय-लीग स्पर्धेचे इंडियन सुपर लीग स्पर्धेत विलीन करणे, त्याबरोबरच 19 वर्षांखालील किमान दोन खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची संधी देणे, तसेच त्यांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक वाटते. याव्यतिरिक्त विदेशी खेळाडू जे ‘क’ दर्जाचे आहेत. त्यांच्यापेक्षा सरस खेळाडूंना भारतीय फुटबॉल स्पर्धेत सामावून घेणे महत्त्वाचे असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रसून बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या मोहन बगान या संघाचे माजी कर्णधार होते. त्यांनी बंगाल संघाकडून खेळताना 1974 ते 1982 या काळात कर्णधार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच बोर्डालोय ट्रॉफी, आय एफ ए शिल्ड, ड्युरँड, रोवर्स, फेडरेशन व दार्जिलिंग गोल्ड चषक फुटबॉल स्पर्धेत त्यांनी एकूण 24 गोल नोंदवले आहेत. त्याबरोबरच बँकॉक, सेऊल, मलेशिया, ढाका या ठिकाणी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.